बेळगाव (प्रतिनिधी) : येथील राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख आणि कला शाखेचे डीएन प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांची नियुक्ती कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरणवर सदस्य म्हणून कर्नाटक सरकारने नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.
सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कायदा सेवा प्राधिकरण कार्यरत आहे या मंडळावर समाजातील विविध स्तरातून समाजशील व्यक्तींची निवड करण्यात येते प्राधिकरणाची उदात्त ध्येयधोरणे अधिक परिणामकारकतेने राबवण्याची जबाबदारी सदस्यांवर ती असते.
विनोद गायकवाड हे शैक्षणिक बरोबरच सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असतात.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन या सेवाभावी संस्थेचे ते दोनवेळा अध्यक्ष होते. या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी कार्य त्यांनी खेड्यापाड्यात पार पाडली. त्यांच्या समग्र कार्याचा विचार करून कर्नाटक सरकारने त्यांची नियुक्ती करून त्यांच्यावर अधिक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
