खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील २००हुन अधिक नागरिकांनी मोफत लसीकरणाचा लाभ घेतला.
येथील मराठी मुलीच्या शाळेत ४५ वर्षावरील नागरिकाना मोफत लसीकरण कार्यक्रम सोमवारी दि. २१ रोजी पार पडला.
यावेळी गणेबैल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
लसीकरणाचा शुभारंभ कार्यक्रमावेळी पीडीओ जी. एल. कामकर यांनी लसीकरणाबदल नागरिकांतून जागृती केली.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा अनुराधा निट्टूरकर सदस्य हणमंत मेलगे, प्रसाद पाटील, अजित पाटील, सदस्या, अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्तीस व ग्राम पंचायत कर्मचारी तसेच नंदकुमार निट्टूरकर उपस्थित होते.
Check Also
म. मं. ताराराणी पदवीपूर्व कॉलेजची कुमारी साधना होसुरकर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात…
Spread the love खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या विद्यालयातील …