खानापूर (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिन खानापूर येथील मांगरीष हाॅलमध्ये सोमवारी दि. २१ जून रोजी पतांजली योग संघाच्यावतीने साजरा करण्यात आला.
यावेळी कोरोनाच्या माहामारीत योगासने हा राम बाण उपाय आहे. नियमित योगासने केली तर आरोग्य चांगले राहते. मन ताजेतवाने होते. शारीरिक, मानसिक विकासासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी बोलताना प्रमोद कोचेरी म्हणाले की, कोरोना काळात नियमितपणे योगा करणाऱ्या
९९ टक्के लोकांना कोरोना संसर्ग होत नाही.
तर किरण येळ्ळूरकर म्हणाले की, नियमित योग साधना केल्यास सर्व प्रकारच्या व्याधी नष्ट होतात.
यामुळे मनोबल वाढते. किमान एक तास तरी योगा करावा. दिवस आनंदीत जातो.
यावेळी अनेक जन आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Check Also
टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड
Spread the love खानापूर : मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच …