Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही; पंतप्रधान मोदी

  नवी दिल्ली: महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे असं पंतप्रधान मोदी एनडीए खासदारांच्या बैठकीत म्हणाले. एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील त्यांनी दाखला दिला. यापुढे देखील आपल्याला एनडीए म्हणून काम करायचं आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असंही मोदी म्हणाल्याचं कळतंय. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, …

Read More »

सूर्या तळपला, तिलक चमकला; भारताचा वेस्ट इंडिजवर सात विकेटने विजय

  करो या मरोच्या मुकाबल्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा सात विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले 160 धावांचे आव्हान भारताने सात विकेट आणि 13 चेंडू राखून सहज पार केले. सूर्यकुमार यादव याने वादळी अर्धशतक झळकावले त्याशिवाय तिलक वर्मा याने नाबाद 49 धावांची खेळी केली. पाच सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने कमबॅक …

Read More »

मंगसुळीत राष्ट्रीयीकृत बँकेची मागणी

  कागवाड : मंगसुळी येथे कर्नाटक विकास ग्रामीण बँक ही एकमेव बँक असून येथील सर्व आर्थिक व्यवहार याच बँकेमध्ये चालतात. सदर बँकही अपुल्या जागेत असून बँकेत कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराला अडचण होत आहे. यासाठी प्रत्येक विभागाचे वेगवेगळे काऊंटर करून कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत …

Read More »

गुंजी गावातील डुकरांचा बंदोबस्त करावा; ग्रामस्थांचे निवेदन

  खानापूर : गुंजी गावामध्ये छावणीतील पाळीव डुक्कर सोडलेली असल्यामुळे गावात डुकरांचा उपद्वाप वाढलेला आहे. याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. परिसरातील शेत पिकांचे देखील नुकसान होत आहे. त्यासाठी डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे निवेदन गुंजी ग्रामस्थांनी पीडीओ आणि ग्रामपंचायत अध्यक्षांना दिले आहे. पाळीव डुकरे गावामध्ये व परिसरातील शेतांमध्ये घुसून …

Read More »

वरकड गावाजवळील पूल पावसामुळे कोसळला!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा गावापासून बारा किलोमीटरवर असलेल्या वरकड गावाजवळील पूल नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. त्यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे. पूल कोसळल्यामुळे बस बंद झाली आहे, त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. मागील वर्षी तात्पुरती डागडुजी झाली होती …

Read More »

तेऊरवाडीत ५०० ग्रामस्थांनी एकत्र येत केली भात रोप लावणी

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी येथे भात रोप लावणीसाठी संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतल्याने पाच एकर क्षेत्रावरील लागण तीन तासातच संपली. ५०० ग्रामस्थ आले धावून अन तेऊरवाडीची भात रोप गेली संपून, अशा या आगळ्या वेगळ्या भात रोपेची चंदगड तालूक्यात जोरदार चर्चा चालू आहे. जे गाव करेल …

Read More »

शेतजमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून निवेदन सादर खानापूर : बेळगाव- पणजी राष्ट्रीय महामार्गावरील शेतजमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत तालुक्यातील रस्ते मंजूर करण्याबाबत खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट …

Read More »

आरोग्य विभाग रात्रीही लागला कामाला; मनपा आयुक्तांचा धसका

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी स्वहर शहर स्वच्छतेच्या कामासंदर्भात विशेष काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. आयुक्त दुडगुंटी यांनी काल सोमवारी पहाटेच कचरा उचलणाऱ्या गाडीतून शहर उपनगरात सुरू असलेल्या स्वच्छता कामाची अचानक पाहणी केली होती. त्यानंतर आज मंगळवारी ही त्यांनी सकाळी सकाळी दक्षिण विभागातील नाले तसेच स्वच्छता …

Read More »

पिरनवाडी- किणये रस्त्याची दुरवस्था!

  बेळगाव : पिरनवाडी ते किणये रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे छोटेमोठे अपघात घडत आहेत. किणये -पिरनवाडी रस्ता हा चोर्ला मार्गे गोव्याला जातो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची …

Read More »

आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेणार

  मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भात अतिशय महत्त्वाचं वृत्त समोर आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेसंदर्भात पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे आता आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. पुढच्या आठवड्यापासून आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाच्या …

Read More »