Monday , September 21 2026
Breaking News

पिरनवाडी- किणये रस्त्याची दुरवस्था!

Spread the love

 

बेळगाव : पिरनवाडी ते किणये रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे छोटेमोठे अपघात घडत आहेत. किणये -पिरनवाडी रस्ता हा चोर्ला मार्गे गोव्याला जातो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्याचप्रमाणे आसपासच्या गावातील बराच कामगार वर्ग उद्यमबाग परिसरात कामासाठी ये -जा करत असतात रात्रपाळीच्या कामावर जाणाऱ्या कामगारांना रस्त्यावरील खड्ड्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढत आहेत. या रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी किणये ग्रामस्थ करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *