Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

जय किसान भाजी मार्केटची इमारत पाडण्याची मागणी!

  बेळगाव : जय किसान खासगी भाजी मार्केटची परवानगी रद्द झाल्यानंतरही इमारत न पाडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संघटनांनी आज बेळगाव महानगरपालिकेसमोर आंदोलन केले. जोपर्यंत ही इमारत तोडली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. जय किसान खासगी भाजी मार्केटची इमारत बांधण्याची परवानगी रद्द झाली आहे, तरीही …

Read More »

पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीला शिक्षा

  बेळगाव : पत्नीचा दारू पिऊन मानसिक व शारीरिक छळ करून नाक कापल्याप्रकरणी आरोपी पती सुरेश परशुराम नाईक (वय 38 रा. शेंडसगळ, महाराष्ट्र) याला बेळगाव न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आरोपी सुरेश हा त्याची पत्नी सुनीता (वय 35 रा. कागवाड, कर्नाटक) हिचा रोज दारू पिऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होता. …

Read More »

दुचाकी चोरट्यांना हिरेबागेवाडी पोलिसांकडून अटक

  बेळगाव : बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या दोन दुचाकी जप्त करत दोघा दुचाकी चोरांना  हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. एकूण 4 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बेळगाव शहरात वाढते चोरीचे प्रकार लक्षात घेत बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे …

Read More »

शाळा वाचवण्यासाठीच्या आंदोलनाला माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांचे समर्थन

  खानापूर : माजी आमदार आणि एआयसीसीच्या सचिव डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांच्याशी चर्चा करून इटगी येथील सरकारी शाळेचा प्रश्न सोडवला. त्यांच्या मध्यस्थीमुळे विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे आंदोलनही समाप्त झाले. डॉ. अंजली निंबाळकर यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी इटगी येथे सरकारी शाळा सुरु केली होती. आणि नंतर ती हायस्कूलमध्ये …

Read More »

भाविकांच्या निर्विघ्न दर्शनासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  मंदिर परिसरात महापालिका, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, देवस्थान समिती यांच्या संयुक्त भेटीत तयारीबाबत आढावा कोल्हापूर : भाविकांचे दर्शन सुलभ होईल त्या अनुषंगाने सर्व व्यवस्था देवस्थान समिती, महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा प्रशासन आई अंबाबाईचा नवरात्र महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने आणि देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहे. भाविकांच्या …

Read More »

सर्वापित्री अमावास्ये निमित्त उद्या रविवारी श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

  बेळगाव : सर्वापित्री अमावास्ये निमित्त उद्या रविवारी दि. 21 रोजी पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता आणि दुपारी बारा वाजता तैलभिषेक करण्यात येणार आहेत. शनी कथा वाचन, शनी शांती आणि तीळ होम यांचेही आयोजन करण्यात आले आहे. दुपारी अभिषेक …

Read More »

येळ्ळूर येथे मराठा समाजाच्या वतीने आज महत्वपूर्ण बैठक

  बेळगाव : सकल मराठा समाजाच्या हितासाठी उद्या रविवार दि. 21/09/2025 रोजी सायंकाळी ठीक 5.00 वा. मराठा मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला पाठिंबा देऊन सदर मेळाव्यात बहुसंख्येने उपस्थित राहण्यासाठी आज शनिवार दि. 20/09/2025 रोजी सायंकाळी 7.00 वा. चांगळेश्वरी मंदिर येथे सर्व पक्षीय मराठा समाजातील …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र- दसरा महोत्सव महामंडळाची महत्त्वपूर्व बैठक आज

  बेळगाव : यंदाचा नवरात्र – दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी बेळगावचे सर्व देवस्थान मंडळाचे हक्कदार, पंचमंडळ, युवक यांची महत्त्वपूर्ण बैठक आज शनिवार दिनांक 20.09.25 रोजी सायंकाळी ठीक 6.00 वा. रामलिंगखिंड गल्ली श्री जत्तीमठ देवस्थानच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत यंदाच्या अकराव्या दिवसाच्या नवरात्र दसरा महोत्सवातील शेवटच्या दिवशी 02 …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय येथील खो-खो खेळाडू जिल्हास्तरीय अजिंक्य!

  खानापूर : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर विद्यार्थिनींच्या अंगभूत कौशल्यावर अधिक भर देणारे कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे. येथे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगती बरोबर क्रीडा कौशल्याकडे जातीने लक्ष दिले जाते! मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर खेळाडू विद्यार्थ्यांसाठी मराठा मंडळ शिक्षण संस्थेमध्ये विविध क्रीडा उपक्रम राबविले …

Read More »

कुणबी-मराठा नोंदीसाठी येळ्ळूर म. ए. समितीची रॅली

  बेळगाव (वार्ता) : कर्नाटक सरकारच्यावतीने जातीनिहाय जनगणना दि. 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत करण्यात येणार आहे. यावेळी सर्व मराठा समाजातील नागरीकांनी धर्म- हिंदू, जात- मराठा, पोटजात- कुणबी आणि मातृभाषा- मराठी अशी नोंद करावी. याची जनजागृती करण्यासाठी रविवार दि. 21 रोजी सायं. 6 वा. रॅली आयोजित करण्यात आली …

Read More »