Monday , September 21 2026
Breaking News

पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीला शिक्षा

Spread the love

 

बेळगाव : पत्नीचा दारू पिऊन मानसिक व शारीरिक छळ करून नाक कापल्याप्रकरणी आरोपी पती सुरेश परशुराम नाईक (वय 38 रा. शेंडसगळ, महाराष्ट्र) याला बेळगाव न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
आरोपी सुरेश हा त्याची पत्नी सुनीता (वय 35 रा. कागवाड, कर्नाटक) हिचा रोज दारू पिऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होता. पतीच्या त्रासाला कंटाळून सुनीता ही माहेरी कागवाड येथे येऊन राहू लागली होती. परंतु आरोपी सुरेश तिच्या माहेरी जाऊन देखील तिला त्रास देत होता. वारंवार विनवणी करून देखील पत्नी सुनीता ही माहेरीच राहत असल्याच्या रागातून 6 जानेवारी 2019 रोजी कागवाड येथील तिच्या घरी जाऊन तिला शेंडसगळ येथे नांदायला ये अशी विनवणी करून देखील तिने नकार दिल्यामुळे रागाच्या भरात तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला आणि झोपेत असताना तिच्या नाकावर आणि चेहऱ्यावर चाकुने वार केला यामध्ये ती गंभीर जखमी झाली. या प्रकरणी कागवाड पोलीस स्थानकात सुरेश नाईक याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता तत्कालीन पीएसआय हनुमंत शिरहट्टी यांनी याप्रकरणी तपास करून सुरेश याच्याविरुद्ध आरोप पत्र दाखल केले होते. खटल्याची सुनावणी करताना बेळगावच्या पाचव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. एस. मंजुनाथ यांनी साक्षी व युक्तिवाद लक्षात घेऊन सुरेश परशुराम नाईक यांना दोषी ठरवत पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप ठेवत एक वर्षाची तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे चाकूने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पाच वर्षाची सक्त मजुरी व तीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारतर्फे सरकारी वकील म्हणून ऍड. आय. एम.‌‌ मठपती यांनी युक्तिवाद केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *