Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

येळ्ळूर ग्रामपंचायत येथे तलावाचे काम करताना रोजगाराच्या (मनरेगा) महिला कामगार

  बेळगाव : येळ्ळूरच्या मंगाई तलावातील साठलेली गाळयुक्त माती एकमेकांच्या मदतीने बाहेर काढून टाकत होते. जेणेकरून या तलावात येणाऱ्या पावसाळ्यात जास्तीचा पाण्याचा साठा होईल व याचा फायदा गावकरी व त्याच्या जनावरांना होईल. ‘मजदूर नवानिर्माण संघाच्या’ माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील व संघटनेचे इतर कार्यकर्ते जिल्ह्यातील …

Read More »

खानापूर- बेळगाव शटल बस सेवा सुरू न केल्यास 14 जुलै रोजी खानापूर वकील संघटनेतर्फे रास्ता रोको

  खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील खानापूर मार्गे बेळगावला दररोज ५००० हून जास्त कॉलेज विद्यार्थी, शिक्षक व नोकरदार मंडळी खानापूरहून बेळगांव व बेळगांवहून खानापूर ये जा करत असतात. वेळेत बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नोकरवर्गही वेळेत पोचू शकत नाही. प्रत्येक अर्ध्या तासाला बस सेवा सुरू केल्यास सर्वांच्या …

Read More »

विरोधी पक्षनेताच नव्हे तर प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा आज होणार : माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा

  बंगळुरू : विधानमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असले तरी विरोधी पक्ष भाजपने अद्याप विधानसभेसाठी नेता जाहीर केला नसल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, आज विरोधी पक्ष नेता आणि भाजपकडून नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी याबाबत माहिती दिली आहे. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना बीएस येडियुरप्पा …

Read More »

निपाणी साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी

  निपाणी (वार्ता) : येथील साईशंकर नगरातील साई मंदिरात ओम श्री साईनाथ विश्वस्त मंडळातर्फे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा उत्साहामध्ये पार पडला. सर्व दोन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमात साईंच्या दर्शनासाठी पाणी आणि परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे आयोजन श्री साईनाथ …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांमधील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (5 जुलै) सकाळीपासून जिल्ह्यात बंदी आदेश लागू झाला असून 19 जुलैपर्यंत हा बंदी आदेश लागू असेल. त्यामुळे कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी …

Read More »

विजेच्या धक्क्याने विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

  बेळगाव : विजेची मोटार सुरू करण्यासाठी गेला असता विजेचा धक्का बसून तरुण विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बाची येथे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. कुणाल कल्लाप्पा कुट्रे (वय १७, मूळचा रा. रामनगर- कडोली, सध्या रा. बाची) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तो शेती व्यवसाय करत होता. दीड …

Read More »

कोणते पवार ‘पॉवरफुल’? आज होणार बहुमताचं चित्र स्पष्ट!

  मुंबई : आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज दोन्ही गटाच्या मुंबईमध्ये बैठका होणार आहेत. कोणत्या बैठकीला कोण उपस्थित राहाणार हे पहाणं महत्त्वाचं ठारणार आहे. आज दोन्ही गटाकडे असलेल्या संख्याबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे. दोन्ही गाटचे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहाता यावं यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. 53 आमदारांपैकी किती आमदार …

Read More »

रामनगर बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने संपन्न

  खानापूर : रामनगर येथील बापूजी ग्रामीण विकास समितीचे पदवीपूर्व महाविद्यालय आज गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक वृंदांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. बोलताना यावेळी कन्नड विभागाच्या प्रमूख श्रीमती मेघना नाईक म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या आदराला प्राप्त व्हावे. कोणीही शिक्षक कोणाही विद्यार्थ्याकडे …

Read More »

गुरु पौर्णिमेनिमित्त श्रीदत्त बाल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

  खानापूर : रामनगर येथील श्री दत्त मंदिर ट्रस्ट कमिटीचे श्री दत्त मंदिर या ठिकाणी सुरू असलेल्या श्री दत्त बाल संस्कार केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त अर्थात श्री महर्षी वेदव्यास जयंती मोठ्या भक्ती भावाने साजरी करण्यात आली. प्रारंभी मंदिराचे पुजारी श्री मोहन आंबेकर यांनी श्री दत्तात्रेयाला अभिषेक घातला. तद्नंतर संस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांनी …

Read More »

केंद्रीय मंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, भाजपने निवडणुकांसाठी आखली रणनिती

  नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकांसाठी कायमच रणनिती आखली जाते. अगदी ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत भाजपमध्ये चाणक्यनिती करत अनेक संघटनात्मक व पक्षीय बदल घडवले जातात. सध्या भाजपाकडून मिशन लोकसभा आखण्यात आलं असून त्यासाठीची तयारीही सुरू करण्यात आलीय. तत्पूर्वी आता ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. …

Read More »