Monday , September 21 2026
Breaking News

कोणते पवार ‘पॉवरफुल’? आज होणार बहुमताचं चित्र स्पष्ट!

Spread the love

 

मुंबई : आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज दोन्ही गटाच्या मुंबईमध्ये बैठका होणार आहेत. कोणत्या बैठकीला कोण उपस्थित राहाणार हे पहाणं महत्त्वाचं ठारणार आहे. आज दोन्ही गटाकडे असलेल्या संख्याबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे. दोन्ही गाटचे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहाता यावं यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. 53 आमदारांपैकी किती आमदार कोणत्या गटाकडे आहेत हे आज स्पष्ट होणार आहे. यानंतरच दोन्ही गटाकडून पुढील रणनिती ठरवली जाणार आहे.

6 जुलैला दिल्लीत बैठक

दरम्यान आज मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर 6 जुलैला म्हणजे उद्या नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शरद पवार हे स्वत: असणार आहेत. या बैठकीत काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीच्या आधारे पक्षाचा प्रभारी कोण असेल याचा निर्णय होणार आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने घेऊन कायदेशीररीत्या आपली बाजू भक्कम करण्याचा शरद पवारांचा हा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. नेमका कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आजची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीमधून दोन्ही गटाकडे असलेल्या संख्याबळाचा आकडा स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *