Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

प्रवासी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू

  बुलढाण्यातील हृदयद्रावक घटना बुलढाणा : बुलढाण्यात एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला …

Read More »

ऊस एफआरपीतील १० रुपयांची वाढ फसवी

  राजू पोवार; रयत संघटनेकडून केंद्राचा निषेध निपाणी (वार्ता) : ऊस एफआरपी रकमेत केवळ १० रुपयांची वाढ केल्याबद्दल चिकोडी जिल्हा रयत संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. ३०) निषेध करण्यात आला. उत्पादन खर्च आणि खतांच्या दरामध्ये एकूण ५२ टक्के वाढ झाली आहे. त्या प्रमाणानुसार केंद्र सरकारने एफआरपीमध्ये १० रुपयांची केलेली वाढ ही …

Read More »

1 लाख 80 हजार किमतीचा तांदूळ जप्त; उद्यमबाग पोलिसांची कारवाई

  मच्छे : बेळगाव खानापूर महामार्गावरील ब्रह्मनगर मारुती मंदिर समोर बेकायदेशीर रेशनचा तांदूळ वाहतूक करणारा ट्रक उद्यमबाग पोलिसांनी अंदाजे 1 लाख 80 हजार किमतीचा तांदूळ जप्त केला. मच्छे, पिरनवाडी, खादरवाडी, हुंचेनट्टी, देसुर परिसरातील सरकारमान्य रेशन दुकानातून गोरगरिबांना मिळणारा स्वस्त तांदूळ पिरनवाडी येथील मुजावर नामक व्यक्ती गल्लोगल्ली जाऊन आपल्या रिक्षा मधून …

Read More »

पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात ड्रग्स विरोधी दिवस साजरा

  बेळगाव : पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय मध्ये धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजनेअंतर्गत ड्रग्स विरोधी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि स्वागत गीताने झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुनाथ सर यांनी केले. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बसवराज सोफीमठ यांनी विद्यार्थ्यांना ड्रग्स विरोधी दिवस निमित …

Read More »

लोकोपयोगी प्रकल्पांना प्राधान्य : महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा

  बेळगाव : शासनाच्या प्रशासकीय व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणून सुशासन देण्यास आमचे प्राधान्य आहे. यासंदर्भात महसूलमंत्री कृष्णा भैरेगौडा यांनी अधिकाऱ्यांना कार्यक्षमतेने व त्वरीत काम करावे, अशा सूचना दिल्या.आज शुक्रवारी (३० जून) सुवर्ण विधानसौध येथे बेळगाव विभागाचे जिल्हाधिकारी आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. या बैठकीत पुढे …

Read More »

शहराला बारा दिवसांनी पाणी पुरवठा!

  बेळगाव : मान्सून लांबणीवर पडल्यामुळे राकसकोप जलाशयाने तळ गाठला आहे. त्यामुळे बेळगांव शहराला राकसकोप जलाशयातील मृत साठ्यातील पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मृत साठ्यातील पाणी शुद्धीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मनपा आयुक्त अशोक दूडगंटी यांनी पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. राकसकोप जलाशयातील पाणीसाठा कमी असल्यामुळे पाणी …

Read More »

देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या जीपला टँकरची धडक; 6 ठार

  सांगली : अक्कलकोटजवळ भीषण रस्ते अपघातात दोन वाहनांची धडक बसून सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. देवदर्शन करून कर्नाटकात गावी परत जाताना भाविकांवर काळाने घाला घातला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. जखमींना अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …

Read More »

विजयनगरमध्ये दोन ऑटो आणि लॉरीमध्ये भीषण अपघात : सात ठार

  होस्पेट : विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट तालुक्यातील वडरहळ्ळी पुलाजवळ दोन ऑटो आणि लॉरी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच महिलांसह सात प्रवाशांचा मृत्यू झाला. तर दोन मुलांसह आठ जण जखमी झाले असून त्यांना विम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेळ्ळारी येथून दोन ऑटोतून १९ जण तुंगभद्रा धरणाकडे जात असताना हा अपघात …

Read More »

यंग बेळगाव फौंडेशनची नंदन मक्कळ धामला मदत

  बेळगाव : आषादी एकादशीनिमित्त यंग बेळगाव फौंडेशनच्या सदस्यांनी नंदन मक्कळ धामला भेट दिली आणि आश्रमातील मुलांना बेबी स्ट्रॉलर, स्टडी टेबल 5 किलोची तांदळाची पिशवी आदी साहित्याची मदत दिली. त्यांनी मुलांसोबत काही वेळ घालवला आणि त्यांच्याशी संवादही साधला. यावेळी शुभम चौगुले, सॅम्युअल रॉड्रिग्स, अद्वैत चव्हाण-पाटील, ध्रुव हंजी, कार्तिक पाटील, ओंकार …

Read More »

खानापूर तालुक्यातील तीन मराठी टीजीटी शिक्षकाची कन्नड हायस्कूलमध्ये बदली

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मराठी शाळातील आठवीचे वर्ग असलेल्या टीजीटी बीएससी बीएड पदवी घेतलेल्या मराठी शिक्षकांची अतिरिक्त शिक्षक म्हणून चक्क कन्नड माध्यमाच्या हायस्कूलमध्ये बदली करून मराठी शिक्षकासह मराठी भाषेवर मोठा अन्याय करण्यात आल्याने मराठी शाळा टिकवून ठेवणे कठीण होत आहे. खानापूर तालुक्यातील तीन उच्च प्राथमिक शाळेत आठवीचा वर्ग …

Read More »