Sunday , July 26 2026
Breaking News

ऊस एफआरपीतील १० रुपयांची वाढ फसवी

Spread the love

 

राजू पोवार; रयत संघटनेकडून केंद्राचा निषेध
निपाणी (वार्ता) : ऊस एफआरपी रकमेत केवळ १० रुपयांची वाढ केल्याबद्दल चिकोडी जिल्हा रयत संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. ३०) निषेध करण्यात आला. उत्पादन खर्च आणि खतांच्या दरामध्ये एकूण ५२ टक्के वाढ झाली आहे. त्या प्रमाणानुसार केंद्र सरकारने एफआरपीमध्ये १० रुपयांची केलेली वाढ ही केवळ सव्वा तीन टक्के आहे. त्यामुळे ही वाढ फसवी असल्याचा आरोप रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केला. येथील शासकीय विश्राम कामात आयोजित संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते.
पोवार म्हणाले, उत्पादक शेतकऱ्याला केंद्रसरकारने एफआरपीमध्ये क्विंटलला दहा रुपये म्हणजेच प्रति टनास शंभर रुपयाची वाढ केल्याचे जाहीर केले आहे. परंतु ही वाढ कोणत्या आधारे केली असा प्रश्न संघटनेनला पडला आहे. वास्तविक पाहता उत्पादन खर्चामध्ये गेल्या वर्षभरात जवळपास ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये रासायनिक खतांची वाढ ही २२ टक्क्याहून होऊन अधिक वाढलेली आहे. यामुळे आता झालेली वाढ ही फक्त सव्वातीन टक्के असल्याने यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या महागाईमुळे व उत्पादन खर्चामध्ये जवळपास ५२ टक्क्याची वाढ झालेली आहे. यामध्ये रासायनिक खते, मजुरी, मशागत, तोडणी वाहतूक, खते, कीटकनाशकांचे दर गगनाला भिडलेले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास गेल्या पाच वर्षांत फक्त शेतकऱ्यांना टनाला ३५० रुपयाची वाढ मिळालेली आहे. यावर केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा पोवार यांनी दिला आहे.
यावेळी सर्जेराव हेगडे, प्रा. हालाप्पा ढवणे, कलगोंडा कोटगे, महेश जनवाडे, विवेक जनवाडे, चिनु कळवमोडे, नामदेव साळुंखे, आनंदा पाटील, बाबासाहेब पाटील, विजय बाळकृष्ण पाटील, सुभाष देवर्षी, बबन जामदार, रमेश मोरे, पवन माने, वैभव कुंभार, बाळू साळुंखे, सदाशिव शेटके, अशोक कुंभार, हरी जाधव, नाना कुंभार, माणिक कांबळे, रामगोंडा पाटील, रवींद्र चेंडके यांच्यासह निपाणी तालुक्यातील रयत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *