Saturday , November 7 2026
Breaking News

विजयनगरमध्ये दोन ऑटो आणि लॉरीमध्ये भीषण अपघात : सात ठार

Spread the love

 

होस्पेट : विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट तालुक्यातील वडरहळ्ळी पुलाजवळ दोन ऑटो आणि लॉरी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच महिलांसह सात प्रवाशांचा मृत्यू झाला. तर दोन मुलांसह आठ जण जखमी झाले असून त्यांना विम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेळ्ळारी येथून दोन ऑटोतून १९ जण तुंगभद्रा धरणाकडे जात असताना हा अपघात झाला. हॉस्पेट ग्रामीण स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यास्मिन, झहीरा, शाम, काशीम तसेच ऑटोचालक उमेश आणि श्याम अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अन्य दोघांची नावे समजू शकले नाहीत. आमदार गवियप्पा, एसपी श्रीहरिबाबू, एसी सिद्धरामेश्वर यांनी होस्पेट येथील सरकारी रुग्णालयात भेट दिली.

About Belgaum Varta

Check Also

बस तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी; अंतिम निर्णय परिवहन विभागाकडे

Spread the love  बेळगाव : महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत चालले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *