Friday , December 19 2025
Breaking News

Classic Layout

पोवाचीवाडी येथील पोलिस पाटलाचा निर्घृण खून

  चंदगड  : पोलिस तक्रारीत नाव घातल्याचा रागातून कोयता, खुरप्याने सपासप वार करून पोवाचीवाडी येथील गाव पोलीस पोलिस पाटील संदीप ज्ञानदेव पाटील (वय ४१) यांचा चार जणांनी निर्घृणपणे खून केला. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. तात्काळ टीसना नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. …

Read More »

हिंदू, मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा राखा

  जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील; निपाणीत शांतता समितीची बैठक निपाणी (वार्ता) : हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी आणि मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण गुरुवारी (ता. २९) साजरा होत आहे. आतापर्यंत निपाणी शहर आणि परिसरात हिंदू आणि मुस्लिम समाज बांधव सामाजिक सलोखा राखून दोन्ही सण शांततेने साजरा करीत आहेत. पण …

Read More »

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला प्रतिनिधित्व हवेच : श्यामसुंदर गायकवाड यांची मागणी

  कित्तूर : कर्नाटक राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाने भारतीय जनता पक्षाला नेहमीच खंबीर साथ दिली आहे. राज्यातील भाजपच्या यशात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे. याची जाणीव ठेवून भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला उत्तर कन्नडा आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी. मी स्वतः उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघातून …

Read More »

संतोष दरेकर यांच्याकडून पुरस्काराची रक्कम गरीब रुग्णाच्या लिव्हर ट्रान्सप्लांटशनसाठी

  बेळगाव : अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी धावून जाणारे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष संतोष दरेकर यांच्या निस्वार्थी कार्याची दखल फ्रिमसन्स लॉज व्हिक्टोरिया क्रमांक नऊने घेतली आहे. दरेकर यांच्या समाजसेवेची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दहा हजार रु रोख, शाल आणि तुळशीचे रोप देऊन फ्रिमसन्स लॉज व्हिक्टोरियाच्या पदाधिकार्‍यांनी दरेकर यांचा …

Read More »

कर्नाटक प्रमाणे शिंदे-फडणवीस सरकारलाही मुळासकट बाजूला करा

  सिद्धरामय्यांचा सांगलीतून हल्लाबोल सांगली : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका, काँग्रेसची सत्ता आणा असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलं आहे. सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर काँग्रेसने महानिर्धार 2024 शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, भारतीय …

Read More »

अमृत योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलांचे दिवास्वप्न

  तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवड; दीड वर्षापासून घरांच्या मंजुरीची प्रतिक्षा निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव अंतर्गत राज्यात विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यानुसार दीड वर्षांपूर्वी कर्नाटकात तत्कालिन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यानी अमृत ग्रामीण वसती योजना जाहीर केली. याअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील काही ग्रामपंचायतीची निवड करून या पंचायतीच्या कार्यक्षेत्रात हक्काच्या …

Read More »

हिमाचल प्रदेशमध्‍ये पावसाचा कहर, मंडी जिल्‍ह्यात माेठे नुकसान

  मंडी : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे मंडी जिल्ह्यातील सेराज खोऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सेरज येथील तुंगाधर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेक वाहने वाहून गेली. कुल्लू जिल्हा मुख्यालयाजवळील दोहरनाला भागात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहल खड्डामध्ये पूर आला होता. हिमाचल प्रदेश राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये …

Read More »

मणिपूरमध्ये पुन्हा ३० जूनपर्यंत इंटरनेटवर बंदी

  नवी दिल्ली : गेले दीड महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार आणि तणावाचे वातावरण कायम आहे. दिवसेंदिवस येथील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा एकदा मणिपूरमधील इंटरनेट सेवेवर ३० जूनच्या दुपारपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मणिपूरात गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला …

Read More »

माजी नगरसेविका, पोलीस अधिकाऱ्याकडून 1 कोटीच्या खंडणीसाठी त्रास

  पोटच्या मुलाशी गैरवर्तणूक अन् संतोष शिंदेंनी कुटुंबासह केला भयावह शेवट गडहिंग्लज : औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रख्यात उद्योगपती अर्जुन समुहाचे प्रमुख संतोष शिंदे यांनी पत्नी आणि मुलासह भयावह पद्धतीने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा झालेला प्रयत्न, त्यानंतर माजी …

Read More »

विश्वचषक वेळापत्रकाची घोषणा 27 जूनला?

मुंबई : भारतात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर केले जाऊ शकते. आयसीसीने या दिवशी मुंबईत एका जंगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे समजते आहे. विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक …

Read More »