Sunday , September 20 2026
Breaking News

पोवाचीवाडी येथील पोलिस पाटलाचा निर्घृण खून

Spread the love

 

चंदगड  : पोलिस तक्रारीत नाव घातल्याचा रागातून कोयता, खुरप्याने सपासप वार करून पोवाचीवाडी येथील गाव पोलीस पोलिस पाटील संदीप ज्ञानदेव पाटील (वय ४१) यांचा चार जणांनी निर्घृणपणे खून केला. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. तात्काळ टीसना नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोवाचीवाडी गावांत तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, देवाची रांगी नावाच्या शेतात शनिवारी संशयित आरोपी रोहित निवृत्ती पाटील याच्याशी आपलं भांडण सुरू असून त्याला समजावून सांगण्यासाठी सुरेश गुरव याने फोन करून पोलिस पाटील संदीप याला बोलावून घेतले. त्यानुसार पोलिस पाटील संदीप हे गुरव यांच्या देवाची रांगी नावाच्या शेतात रोहित पाटील, निवृत्ती राजाराम पाटील, अरूण राजाराम पाटील व योगेश अरुण पाटील (सर्व रा. पोवाचीवाडी ता. चंदगड) यांना समजावण्यासाठी गेले असता पूर्व वैमनश्यातून पोलिस तक्रारीत नाव घातल्याच्या रागातून चौघांनी मिळून कोयता व खुरप्याने हातावर, डोकीत व मानेवर सपासप वार केले.‌ यामध्ये संदीप यांचा जागीच मृत्यू झाला.

संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप यांच्या मागे माजी पंचायत समितीच्या सदस्या व पत्नी अनुराधा, आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

तक्रारीत नाव घातल्याचा राग

संशयित रोहित व शांताराम आप्पा गावडा (रा. देवकांडगाव, ता. आजरा) या नातलगात मार्च २०२३ रोजी भांडण झाले होते. यामध्ये रोहित व भावकीतील काहीजणांच्या विरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यामध्ये मयत पोलिस पाटील संदीप यानेच आपले नाव तक्रारीमध्ये घातल्याच्या रागातून हा खून झाल्याचे घटनास्थळावरून समजते.

About Belgaum Varta

Check Also

तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; हुक्केरी तालुक्यातील तिघांना अटक

Spread the love  चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *