Saturday , December 20 2025
Breaking News

Classic Layout

शक्तिप्रदर्शनाने बेळगाव ग्रामीणमधून भाजपचे नागेश मन्नोळकर यांचा अर्ज दाखल

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार नागेश मन्नोळकर यांनी आज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला. ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांच्यासह भाजपमधील अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने सर्वांचे लक्ष लागलेली बेळगाव ग्रामीणची उमेदवारी भाजपने नागेश …

Read More »

बेळगाव जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी 46 अर्ज दाखल; एकूण संख्या 74

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी 46 अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची एकूण संख्या 74 झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी सुरु झाली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी 38 उमेदवारांनी 46 अर्ज सादर केले. त्यापैकी 44 उमेदवार पुरुष असून 2 …

Read More »

४० टक्के कमिशन सरकारला फक्त ४० जागा द्या : राहुल गांधी

  भालकी, हुमनाबाद येथे जाहीर सभांना संबोधन बंगळूर : कर्नाटकात भाजपच्या अधिपत्याखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘४० टक्के कमिशन सरकार’ चालवणाऱ्या सत्ताधारी पक्षाला केवळ ४० जागा देण्याचे आवाहन केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना, पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला आमदार खरेदी करण्याची …

Read More »

निपाणीतून युवा नेते उत्तम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी

कार्यालयातील बैठकीत घोषणा : पहिल्या यादीतच मिळाली उमेदवारी निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील पिकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांना सोमवारी (ता.१७) विधानसभेसाठी निपाणीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच निपाणी भागात विधानसभेसाठी पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे उत्तम पाटील समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून …

Read More »

मुरलीधर पाटील यांचा शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल

  खानापूर : खानापूर मतदारसंघातून कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांनी आज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत मिरवणुकीद्वारे अर्ज दाखल करण्यात आला. मिरवणुक खानापूर शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीत अग्रभागी …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक

बेळगाव : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातुन अधिकृत उमेदवार म्हणून श्री. आर. एम. चौगुले यांची सर्वानुमते निवड झाली असून, पुढील रणनीती ठरविण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या मंगळवार दिनांक १८ रोजी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती कार्यालय सदाशिवनगर (लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या मागे) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व आजी-माजी …

Read More »

शिक्षक भरकटल्यास समाज भरकटेल

प्राचार्य डॉ. व्ही. एल. पुजारी : शिक्षक, विद्यार्थी संघाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देवाने पालक आणि शिक्षक निर्माण केले आहे. त्यामुळे देव सर्वत्र असू शकत नाही. शिक्षक हेच विद्यार्थ्यांना उपदेश देतात. शिक्षकच भरकटले तर संपूर्ण समाज भरकटेल, असे मत प्राचार्य डॉ. व्ही. एल. पुजारी यांनी व्यक्त केले.  येथील केएलई संस्थेच्या …

Read More »

काका पाटलांना मताधिक्य देणार

  ग्राम पंचायत सदस्यांचा निर्धार : प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कोगनोळी : काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील यांना कोगनोळी गावातून भरघोस मताधिक्य देणार असा निर्धार ग्रामपंचायत सदस्यांनी केला. कोगनोळी तालुका निपाणी येथे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष …

Read More »

जेडीएसचे नासीर बागवान यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  खानापूर : खानापूर जेडीएसचे अधिकृत उमेदवार नासीर बागवान यांनी आपल्या समर्थकासोबत नामपत्र दाखल केले आहे. सोमवारी श्री छत्रपती शिवाजी स्मारक येथे येऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नामपत्र दाखल करण्यासाठी खानापूर तहसीलदार कार्यालयाकडे प्रयाण झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना उमेदवार नासीर बागवान म्हणाले की, खानापूर तालुक्याचा दुर्दैव …

Read More »

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक उद्या

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे चारही मतदार संघासाठी उमेदवार निश्चित झाले असून उमेदवारांच्या नावाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीसाठी बेळगाव उत्तरमधून अमर येळ्ळूरकर, दक्षिणमधून रमाकांत कोंडुसकर, ग्रामीणमधून आर. एम. चौगुले आणि खानापूरमधून मुरलीधर पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी …

Read More »