Sunday , July 26 2026
Breaking News

शक्तिप्रदर्शनाने बेळगाव ग्रामीणमधून भाजपचे नागेश मन्नोळकर यांचा अर्ज दाखल

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार नागेश मन्नोळकर यांनी आज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांच्यासह भाजपमधील अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने सर्वांचे लक्ष लागलेली बेळगाव ग्रामीणची उमेदवारी भाजपने नागेश मन्नोळकर यांना दिली. त्यामुळे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना व इच्छुकांना धक्का बसला होता. मात्र नेत्यांनी समजूत काढल्याने पक्षाचा आदेश शिरसांवद्य मानून इच्छुक व कार्यकर्त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य करत नागेश मन्नोळकर यांच्या प्रचारात झोकून दिले आहे. भाजपमधील किंगमेकर नेते रमेश जारकीहोळी यांचे ते निकटवर्तीय आहेत. त्यानंतर आज भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करत नागेश मन्नोळकर यांनी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी धर्मवीर संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराज त्यांच्या पुतळ्याचे पूजन त्यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी नागेश मन्नोळकर आणि भारतीय जनता पक्षाच्या जयजयकार करणाऱ्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी नागेश मन्नोळकर यांच्या समवेत भाजपचे किंगमेकर नेते रमेश जारकीहोळी, महाराष्ट्राचे मंत्री व बेळगाव निवडणूक प्रभारी गिरीश महाजन, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भाजप ओबीसी मोर्चा राज्य सचिव किरण जाधव, महिला मोर्चा पदाधिकारी डॉ. सोनाली सरनोबत, विनय कदम आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

माळमारुती पोलिसांकडून ४६ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत; CEIR पोर्टलचा प्रभावी वापर

Spread the love  बेळगाव : माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले तब्बल ४६ मोबाईल फोन शोधून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *