Saturday , June 6 2026
Breaking News

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक उद्या

Spread the love

 

बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे चारही मतदार संघासाठी उमेदवार निश्चित झाले असून उमेदवारांच्या नावाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीसाठी बेळगाव उत्तरमधून अमर येळ्ळूरकर, दक्षिणमधून रमाकांत कोंडुसकर, ग्रामीणमधून आर. एम. चौगुले आणि खानापूरमधून मुरलीधर पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे.

आता विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरविण्यासंदर्भात मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता मराठा मंदिर येथे बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला सर्व आजी-माजी नगरसेवक, महिला – युवा संघटना आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बातमीपासून वृत्तपत्रापर्यंत’चा रोमांचक प्रवास; विद्यार्थ्यांनी अनुभवली पत्रकारितेची दुनिया!

Spread the love  विजयवाणी कार्यालय व अत्याधुनिक प्रिंटिंग युनिटला सरकारी सरदार्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *