Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

संत मीरा, सेंट जोसेफ, सेंटपॉल, भरतेश, डीपी शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश

  बेळगांव : गणेशपुर रोड येथील गुडस शेफर्ड शाळेच्या टर्फ मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित बेळगाव शहर तालुकास्तरीय प्राथमिक मुला -मुलींच्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनच्या दिवशी संत मीरा, सेंट जोसेफ, सेंटपॉल, भरतेश, डीपी शाळेच्या संघानी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्राथमिक मुलांच्या गटात पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल शाळेने …

Read More »

सलामवाडीत रंगला होम मिनिस्टरचा कार्यक्रम…..

  दड्डी (वार्ताहर) : सलामवाडी ता. हुक्केरी येथील ओंकार गणेश उत्सव मंडळातर्फे आयोजित केलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या महिलांसाठी बॉल फेकणे, डोक्यावरून फुगे मारणे, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, उखाणे, आरती तयार करणे इत्यादी स्पर्धात्मक खेळ घेण्यात आले. स्पर्धेत पहिला क्रमांक शुभांगी …

Read More »

सलामवाडी येथील बैलगाडी शर्यतीत कुदनूरची जोडी प्रथम

  दड्डी (वार्ताहर) : सलामवाडी ता. हुक्केरी येथे मा. नवजीवन युवक संघ सलामवाडी यांच्या सौजन्याने भव्य बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शर्यतीत कर्नाटक, महाराष्ट्र भागातील 50 बैल जोडी मालकांनी भाग घेतला होता. एक मिनिट गाडी पळविण्याच्या शर्यतीत सिद्धेश्वर प्रसन्न (कुदनुर) यांच्या जोडीने 1890.4 इतके अंतर ओढून प्रथम …

Read More »

रुग्णसेवक, प्राचार्य आनंद आपटेकर यांचा विशेष सत्कार

  बेळगाव : सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ श्री राजा शिव छत्रपती युवक मंडळ कोनवाळ गल्ली छत्रपती शिवाजी रोड बेळगाव या मंडळाच्या वतीने दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी महाप्रसादाचा आयोजन केलं होतं. या कार्यक्रमा च्या निमताने ऋणसेवक प्राचार्य श्री. आनंद अरुण आपटेकर वैद्यकीय समन्वय, महाराष्ट्र एकीकरण समिती व कार्यकारी सचिव …

Read More »

सौंदत्ती तालुक्यातील हलकी-मुरगोड रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हलकी-मुरगोड रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुरगोड गावच्या बाहेर एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना चिरडल्याने ही दुर्घटना घडली. मृतांची ओळख पटली असून विशाल लमाणी (२०) आणि अप्पू लमाणी (२३) अशी त्यांची नावे आहेत. ते सौंदत्ती तालुक्यातील हुलिकेरी तांडा येथील …

Read More »

भाजपा नेते किरण जाधव यांची सार्वजनिक गणेश मंडळांना भेट!

बेळगाव : भाजपाचे नेते किरण जाधव तसेच इतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडपांना भेट देऊन दर्शन घेतले व पूजेत सहभागी झाले. या भेटीदरम्यान जाधव यांनी उद्याच्या गणेश विसर्जनासाठी असलेल्या मार्गांचा तसेच तलावांचा आढावा घेतला. पुढे नार्वेकर गल्ली युवक मंडळाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात बोलताना त्यांनी गणेशोत्सवाच्या भव्यतेचा गौरव …

Read More »

कॅन्सर लसीकरण व अनाथांच्या शिक्षणासाठी रोटरी क्लब ऑफ बेलगाम साउथचा चॅरिटी शो “द दमयंती दामले”

  बेळगाव : समाजहितासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लब ऑफ बेलगाम साऊथ यांच्या वतीने सांस्कृतिक आणि सामाजिकतेचा संगम घडवून आणणारा एक वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. मंगळवार, दि. ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता के.एल.ई. संकुलातील डॉ. बी. एस. जिर्गे सभागृहात ‘द दमयंती दामले’ हा चॅरिटी शो आयोजित करण्यात आला …

Read More »

शिक्षकदिनी शिक्षकांचा पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी संदेश

  बेळगाव : दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त मराठी विद्यानिकेतनचे शिक्षक धर्मवीर संभाजी चौकात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी संदेश देण्यासाठी उभे होते. शनिवारी होणाऱ्या अनंत चतुर्दशीवेळी प्रदूषण टाळून पर्यावरणाचा मित्र बनण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले. यावेळी फटाके विरहित, डॉल्बी डीजे विरहित गणेशोत्सव साजरा करण्याचे फलक लावण्यात आले होते. या समाजभान …

Read More »

खेमाजीराव गोडसे शैक्षणिक ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सोमवारी

  बेळगाव : खेमाजीराव गोडसे शैक्षणिक ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सोमवार दि. 8 रोजी आयोजित करण्यात आला आहे. कॉलेज रोड येथील सह्याद्री पतसंस्थेच्या सभागृहात सायंकाळी 5.30 आयोजित या समारंभाला प्रमुख पाहुणे या नात्याने पायोनियर अर्बन बँकेचे संचालक शिवराज पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी गोडसे कुटुंबियांकडून जवळपास एक लाख रूपयांची …

Read More »

स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत ईव्हीएम रद्दची शिफारस; मतपत्रिकेचा वापर करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

  बंगळूर : ‘ईव्हीएम विश्वासार्हता गमावत आहेत. या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ईव्हीएम बंद करण्याची शिफारस करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्य निवडणूक आयोगाला (एसईसी) भविष्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) …

Read More »