Friday , April 10 2026
Breaking News

रुग्णसेवक, प्राचार्य आनंद आपटेकर यांचा विशेष सत्कार

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ श्री राजा शिव छत्रपती युवक मंडळ कोनवाळ गल्ली छत्रपती शिवाजी रोड बेळगाव या मंडळाच्या वतीने दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी महाप्रसादाचा आयोजन केलं होतं. या कार्यक्रमा च्या निमताने ऋणसेवक प्राचार्य श्री. आनंद अरुण आपटेकर वैद्यकीय समन्वय, महाराष्ट्र एकीकरण समिती व कार्यकारी सचिव मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बेळगाव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी व लक्ष्मण किल्लेकर यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मागच्या वर्षी 5 सप्टेंबर 2024 रोजी कोनवाळ गल्लीतील एक रुग्ण प्रशांत हांडे किडनी ट्रान्सप्लांटची गरज होती. विविध प्रसार माध्यमातून मदतीचा आव्हान ही सुद्धा केलं होतं. त्या रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून 2,00,000 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या वेळेचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांचे विशेष अधिकारी व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे यांनी विलंब न करता ती निधी उपलब्ध करून दिले. आज या गणेश उत्सवा गणेश उत्सव दरम्यान त्या घटनेला एक वर्ष होतं. आज प्रशांत हांडेची तब्येत पुन्हा पूर्वीसारखी उत्तम झाली आणि आज तो पुन्हा आपल्या नोकरी व्यवसायात कार्यरत आहे. एका युवकावर आणि घरचा प्रमुख असणाऱ्या व्यक्ती वरती असं संकट येणे म्हणजे पूर्ण घरावर संकट आल्यासारखं आहे. श्री. आपटेकर यांनी विघ्नहर्ताकडे प्रार्थना केली की असे संकट कोणावर येऊ नये आणि आल्यास तर निश्चित आम्ही सर्वजण अशा रुग्णाला मदत करून त्यांना संकटास समोरे जाण्यासाठी कार्यात राहू. श्री. आपटेकर यांनी समिती नेते रमाकांतदादा कोंडुस्कर, तज्ञ समिती अध्यक्ष माननीय खासदार धैर्यशील माने, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर सर यांचे आभार मानले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी रोड मंडळाचे अध्यक्ष विनायक पवार, मदन अष्टेकर, कुंज नावगेकर, महेश नावगेकर, कुणाल हांडे, आकाश हांडे, प्रदीप किल्लेकर, शिवम उरणकर व महिला मंडळ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

डॉ. श्रुती पानसे ११ व १२ एप्रिल रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेत शिक्षकांची कार्यशाळा

Spread the love  बेळगाव : डॉ. श्रुती पानसे ह्या महाराष्ट्रातील मेंदू आधारित अध्ययनाच्या तज्ज्ञ असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *