Thursday , December 18 2025
Breaking News

Classic Layout

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर यांनी केले आहे.

Read More »

शॉर्टसर्किटमुळे ऊसाच्या मळ्याला आग

  सांबरा : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकरात पिकवलेला सुमारे ९ टन ऊस जळून भस्मसात झाला. आज बुधवारी सांबरा (ता. बेळगाव) येथील शिवारात ही घटना घडली. सुनील देसाई व धनंजय देसाई अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत. या घटनेत सदर शेतकऱ्यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच मारीहाळ …

Read More »

खानापूरात नगरोत्थान योजनेतून विकासकामाचा शुभारंभ

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मुख्यमंत्री अमृत नगरोत्थान योजनेंतर्गत नगरविकास टप्पा चार मधील रस्ते व गटारी कामे करण्यास गेल्या दोन महिन्यापासून विलंब झाला. याबाबत नगराध्यक्ष नारायण मयेकर, नगरसेवक आपय्या कोडोळी, रफिक वारेमनी आदीनी नगरविकास खात्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन ठेकदाराच्या बेजबाबदारीमुळे विकास कामात खंड पडला. त्याच्यावर कारवाईची मागणी करताच …

Read More »

सरकारी इमारतीला नगरपंचायतीची परवानगी गरजेची नाही

  खानापूर स्थायी कमिटी बैठकीत चर्चा खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील कोणत्याही सरकारी इमारतीच्या बांधकामासाठी नगरपंचायतीकडून इमारत बांधकामासाठी परवानगीची गरज नाही, अशी माहिती नगरपंचातीच्या अभियंत्याकडून नगरपंचातीच्या स्थायी कमिटीच्या बैठकीत सांगण्यात आले. सध्या खानापूर शहरात सरकारी हाॅस्पिटलच्या बांधकाम सुरू आहे. यावरून बैठकीत चर्चा झाली. खानापूर नगरपंचातीच्या स्थायी कमिटीची बैठक बुधवारी दि. …

Read More »

शिवसेनेवर आता आणखी एक नवं संकट, उद्धव ठाकरेंचं पद धोक्यात? उरले फक्त 12 दिवस!

  मुंबई : शिवसेनेसमोर अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. एकीकडे धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे अवघ्या 12 दिवसांमध्ये यावर कसा तोडगा निघणार हे पाहण्याचे ठरणार आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे मंगळवारी सुनावणी पार …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले….

  बेळगाव : रेणुका देवी सौंदत्ती (यल्लम्मा) यात्रा संपून येळ्ळूरचे भाविक गावाच्या बाहेर मळ्यातील हणमंत गौड नगर येथे यात्रा महोत्सव साजरा केला जातो. यावेळी जो काही कचरा निर्माण होतो त्यासाठी येळ्ळूर ग्राम पंचायतीने यात्रे ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला कचरा जमा करण्यासाठी कचरा पिशवीची व्यवस्था केले होती. भाविकांना आवाहन केले होते की, …

Read More »

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची छापेमारी

  कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मोठी घडामोड घडत आहे. सत्तांतर झाल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती मिळत कागल येथील घराबाहेर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी …

Read More »

आरआरआरमधील ‘नाटू नाटू’ गाण्यानं पटकावला गोल्डन ग्लोब पुरस्कार

  गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ‘आरआरआर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली आहेत. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार ‘आरआरआर’ मधील नाटू नाटू या गाण्यानं पटकावला आहे. तसेच बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) या कॅटेगिरीमधील नामांकन देखील आरआरआर या चित्रपटाला मिळाल आहे. …

Read More »

किंग कोहलीचे ‘विराट’ शतक; भारताचा लंकेवर ६७ धावांनी दणदणीत विजय

  गुवाहाटी : भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान मर्यादित षटकांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला मंगळवारी (१० जानेवारी) खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. भारताने विराट कोहली आणि उमरान मलिकच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर तब्बल ६७ धावांनी श्रीलंकेवर विजय …

Read More »

सम्मेद शिखरजी दर्शनाने चारशे तीन करोड उपवासाचे फळ

विपूल हवले : शिखरजी यात्रा नियोजन बैठक कोगनोळी : पवित्र सम्मेद शिखरजी भावपूर्ण दर्शन केल्याने 48 भावात मुक्ती मिळते. सम्मेद शिखरजी दर्शनाने चारशे तीन करोड उपवासाचे फळ मिळते. जैन समाजातील पवित्र समजल्या जाणारी सम्मेद शिखरजी यात्रा जन्माला येऊन एकदा तरी करावी. ग्रामपंचायत सदस्य राजगोंड टोपान पाटील यांनी गेल्या वर्षी 130 …

Read More »