विपूल हवले : शिखरजी यात्रा नियोजन बैठक
कोगनोळी : पवित्र सम्मेद शिखरजी भावपूर्ण दर्शन केल्याने 48 भावात मुक्ती मिळते. सम्मेद शिखरजी दर्शनाने चारशे तीन करोड उपवासाचे फळ मिळते. जैन समाजातील पवित्र समजल्या जाणारी सम्मेद शिखरजी यात्रा जन्माला येऊन एकदा तरी करावी. ग्रामपंचायत सदस्य राजगोंड टोपान पाटील यांनी गेल्या वर्षी 130 लोकांना मोफत सम्मेद शिखरजी यात्रा करून आणली हे काम फार पुण्याचे आहे. एक हजार आठ लोकांना सम्मेद शिखरजी यात्रा मोफत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. चालू वर्षी 150 लोकांना ते सम्मेद शिखरजी, पावापुरी, चंपापुरी, पंचतीर्थ दर्शन मोफत करून आणणार आहेत. पवित्र सम्मेद शिखरजी दर्शन करून पुण्य प्राप्त करून घ्यावे असे प्रतिपादन विपुल हवले यांनी व्यक्त केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथे सम्मेद शिखरजी यात्रा नियोजन बैठकीत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील होते.
धीरज मगदूम यांनी स्वागत करून प्रास्ताविकात सम्मेद शिखरजी मोफत यात्रेची रूपरेषा सांगितली.
यावेळी कोगनोळी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एन अलगुरे, बाबुराव पाटील, नरसु पाटील, अशोक वंदुरे, ऋषिकेश पाटील, सुरेखा पाटील, राजगोंडा चौगुले, धनंजय मोनाप, पोपट पाटील, अवि पाटील, अभिजीत पाटील, बाबुराव आवटे, अनिता चौगुले, राणी चौगुले, ज्योती मगदूम, सन्मती चिंचणे, सुवर्णा पाटील यांच्यासह अन्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
