Sunday , July 26 2026
Breaking News

उचगाव, हिंडलगा परिसरात उद्या ७ तास वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

बेळगाव : वीज वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी हेस्कॉमकडून नियोजित वीज बंद ठेवण्यात येणार असल्याने शुक्रवार, दि. ५ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उचगाव व हिंडलगा उपकेंद्रांवरून वीजपुरवठा होणाऱ्या अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

हेस्कॉम ग्रामीण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उचगाव उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, राकसकोप, कुद्रेमनी, कल्लेहोळ, बेळगुंदी औद्योगिक वसाहत, उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे, सुळगा, तुरमुरी, कोनेवाडी, बाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, अंगडी महाविद्यालय परिसर, गणेशपूर महालक्ष्मीनगर, आर्मी कॉलनी, केएचबी ले-आऊट तसेच संबंधित भागातील कृषी पंपसेटचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच हिंडलगा उपकेंद्राच्या क्षेत्रातील हिंडलगा पंप हाऊस, गणेशपूर, हिंडलगा, मण्णूर, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, विजयनगर, डिफेन्स कॉलनी, क्रांतीनगर, मास्तीनगर, शिवमनगर, गोजगा, आंबेवाडी आणि परिसरातील कृषी पंपसेट यांनाही या कालावधीत वीजपुरवठा मिळणार नाही.

नागरिकांनी आवश्यक कामांचे नियोजन करून सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉम ग्रामीण विभागाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *