बेळगाव : रेणुका देवी सौंदत्ती (यल्लम्मा) यात्रा संपून येळ्ळूरचे भाविक गावाच्या बाहेर मळ्यातील हणमंत गौड नगर येथे यात्रा महोत्सव साजरा केला जातो. यावेळी जो काही कचरा निर्माण होतो त्यासाठी येळ्ळूर ग्राम पंचायतीने यात्रे ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला कचरा जमा करण्यासाठी कचरा पिशवीची व्यवस्था केले होती. भाविकांना आवाहन केले होते की, कचरा पिशवीत जमा करावा. भाविकांनी सुद्धा ग्राम पंचायतच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला व ग्राम पंचायतचे कौतुक केले. आज सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. व तो परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा पाटील, सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे, परशराम परीट, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, अजय पाटील, ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.