Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

चापगांवात गणेश समुदाय भवनाचा उद्घाटन सोहळा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : चापगांवात (ता. खानापूर) येथील गावकऱ्यांच्या संकल्पनेतून नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गणेश समुदाय भवनाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी दि. २७ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकट क. पाटील (मा. पैलवान) चापगांव हे होते. कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने झाली. यावेळी समुदाय भवनाचे उद्घाटन चापगांव ग्रा. पं. उपाध्यक्ष मारुती …

Read More »

शिंदोळीत नुतन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पाया खोदाई शुभारंभ

  खानापूर (प्रतिनिधी) : शिंदोळी (ता खानापूर) येथील ग्राम दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करून नुतन मंदिराचा पाया खोदाई शुभारंभ दीपावलीच्या शुभमुहुर्तावर नुकताच करण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई तसेच ग्राम पंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमोद कोचेरी, …

Read More »

प्रगतिशील लेखक संघातर्फे उद्या व्याख्यान

बेळगाव : प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने शुक्रवार दि. २८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक अनिल आजगावकर यांचे “ब्रिटनमधील राजकीय उलथापालथ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभाग्रहात हा कार्यक्रम होणार आहे. सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले …

Read More »

अलतगा येथील खाणीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

  बेळगाव : अलतगा ता. बेळगाव येथील खडी मशीननजीक दगडखाणीत तीन दिवसांपूर्वी बुडून मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह आज सापडला. तीन दिवसांपूर्वी ही दुर्देवी घटना घडली होती. मंगळवारी सांयकाळी, तीन मित्र खेळण्यासाठी अलतगा येथील खडी मशीन परिसरात गेले होते. यावेळी खडी मशीननजीक दगडाच्या खाणीत पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या सतीश हणमन्नवर (वय 22 …

Read More »

मार्गाची पाहणी करूनच फेरीला परवानगी : पोलीस उपायुक्त (डीसीपी) रवींद्र गडादी

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली येत्या 1 नोव्हेंबर काळा दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या सायकल फेरीच्या मार्गाची सर्वप्रथम पाहणी करून त्यानंतर ही फेरी काढण्यास परवानगी दिली जाईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त (डीसीपी) रवींद्र गडादी यांनी दिले आहे. भाषावार प्रांतरचनेवेळी बेळगावसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेल्याच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे येत्या 1 नोव्हेंबर …

Read More »

विकासकामांसाठी महिलांचे सहकार्य आवश्यक : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

बेळगाव : बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतर्गत बडाल अंकलगी गावात आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गावातील समस्यांवर स्थानिकांशी चर्चा केली. आपल्या आमदारकीच्या नेतृत्वाखाली ते बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून त्यांनी याआधीही अपेक्षेपेक्षा जास्त विकास कामे केली आहेत. पुढील विकासासाठी विशेषत: ज्येष्ठांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे …

Read More »

येळ्ळूर येथील बाराभावची साफसफाई; गावकऱ्यात समाधान

  बेळगाव : येळ्ळूर येथील बाराभाव या गोड्या पाण्याच्या विहिरीची येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतिश बा. पाटील यांनी चांगळेश्वरी युवक मंडळ येळ्ळूर यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवून साफसफाई केल्याने गावकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील बाराभाव या गोड्या पाण्याची विहीर गवत, झाडे झुडपे आणि पाल्यापाचोळ्याने भरली होती. …

Read More »

‘अविघ्न क्लासिक, श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा रविवारी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने पवन काकतकर व टीम आयोजित आणि युवा भाजप नेते किरण जाधव पुरस्कृत ‘अविघ्न क्लासिक -2022’ ही जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा आणि ‘अविघ्न श्री -2022’ ही जिम पातळीवरील सौष्ठव स्पर्धा येत्या रविवार दि. 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे बोलाविण्यात आली आहे. यावेळी १ नोव्हेंबर काळादिन कर्नाटक सरकारचा निषेध करण्याबाबत तसेच तालुका विभागीय बैठका घेऊन गावोगावी जनजागृतीची रुपरेषा ठरविण्यासाठी आणि संघटना बळकट करणेबाबत विचारविनिमय करावयाचा …

Read More »

बाल शिवाजी भक्त मंडळाच्या किल्ला प्रतिकृतीचे उद्घाटन

  बेळगाव : वडगाव संभाजीनगर चौथा क्रॉस येथील बाल शिवाजी भक्त मंडळाने साकारलेल्या मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील भारतगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. दीपावलीनिमित्त वडगाव संभाजीनगर चौथा क्रॉस येथील बाल शिवाजी भक्त मंडळाने यंदा महाराष्ट्रातील मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील भारतगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. सदर किल्ल्याचा उद्घाटन …

Read More »