Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे बोलाविण्यात आली आहे. यावेळी १ नोव्हेंबर काळादिन कर्नाटक सरकारचा निषेध करण्याबाबत तसेच तालुका विभागीय बैठका घेऊन गावोगावी जनजागृतीची रुपरेषा ठरविण्यासाठी आणि संघटना बळकट करणेबाबत विचारविनिमय करावयाचा आहे. तसेच याच दिवशी काळादिन पाळण्याबाबत पत्रके वाटप करायची आहेत. तरी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबरराव पाटील कळवितात.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *