Sunday , July 26 2026
Breaking News

येळ्ळूर येथील बाराभावची साफसफाई; गावकऱ्यात समाधान

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर येथील बाराभाव या गोड्या पाण्याच्या विहिरीची येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतिश बा. पाटील यांनी चांगळेश्वरी युवक मंडळ येळ्ळूर यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवून साफसफाई केल्याने गावकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.

येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील बाराभाव या गोड्या पाण्याची विहीर गवत, झाडे झुडपे आणि पाल्यापाचोळ्याने भरली होती. या विहिरीला फिल्टर प्लांट जोडण्यात आला आहे. एकंदरीत गावातील सर्व लोक पिण्याच्या पाण्यासाठी बाराभाव विहिरीचा वापर करतात. मात्र अलीकडे या विहिरीमध्ये वाढलेल्या झाडाझुडपांमुळे पाणी दूषित होण्याचा धोका लक्षात घेऊन ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी चांगळेश्वरी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही विहिर तातडीने स्वच्छ केली. त्यांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून गावकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे. बाराभाव विहिरीच्या साफसफाईसाठी ग्रा. पं. अध्यक्ष सतिश बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगळेश्वरी युवक मंडळाचे कार्यकर्ते अजय अरुण पाटील, संदीप बाळकृष्ण पाटील, अनिकेत यल्लाप्पा पाटील, आदित्य हनमंत पाटील, श्रीनाथ मनोहर देसाई, हेमंत पांडुरंग पाटील, वैभव गजानन पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *