Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे जागतिक टपाल दिन साजरा

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे जागतिक टपाल दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. टपाल दिनाचे औचित्य साधून योग साधकांना टपाल वाटप करण्यात आली. टपाल दिनानिमित्त सर्वांनी टपाल लिहिण्याविषयी सांगण्यात आले. त्यानुसार सौ. शैलजा जेरे यांनी बोलके पत्र लिहून सर्वांना योग करा निरोगी राहा. हा संदेश दिला आहे. …

Read More »

लैला शुगर्सचा उद्या गाळप समारंभ

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला शुगर्सचा ऊस गाळप समारंभ मंगळवारी दि. ११ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी मोळी पुजन आणि क्रेन कॅरियरची पुजा कार्यक्रम होणार आहेत. यावेळी प पू रामदास महाराज विश्वात्मक गुरूदेव सिध्दाश्रम मठ तोपिनकट्टी, प पू चन्नबसव देवरू …

Read More »

संजय राऊतांचा जेलमध्ये मुक्काम वाढला; पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला

  मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढकेली आहे. पुढील सुनावणी 17 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे राऊतांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली …

Read More »

तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाचे उद्घाटन 12 ऑक्टोबर रोजी

बेळगाव : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा वेळ उपलब्ध न झाल्यामुळे अखेर खासदार मंगल अंगडी यांच्याहस्ते बुधवार 12 ऑक्टोबर रोजी या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सकाळी 11 वा. याचे उद्घाटन करण्यात येणार असून, यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी आमदार अभय पाटील राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी …

Read More »

…तब्बल पाच वर्ष पोटात कात्री घेऊन जगत होती महिला; प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

  केरळ येथील एक 30 वर्षीय महिला गेल्या 5 वर्षांपासून पोटदुखीच्या समस्येने हैराण होती. मात्र या समस्येचे कारण समोर आल्यानंतर प्रत्येकालाच धक्का बसला आहे. गेल्या पाच वर्षांपासून या महिलेच्या पोटात एक कात्री अडकलेली होती. यामुळे या महिलेला तीव्र वेदनेचा सामना करावा लागत होता. 2017 साली कोझिकोड येथे राहणार्‍या हर्षीना नावाच्या …

Read More »

शिवसेनेचं नवं चिन्ह क्रांती घडवून आणेल : संजय राऊत

  मुंबई : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासही मज्जाव केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत …

Read More »

श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सोसायटीच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

  बेळगाव : श्री मळेकरणी क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित, उचगांव या सोसायटीच्यावतीने विविध पुरस्कार व सत्कार सोहळा शंकर-पार्वती कार्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्रीमान जवाहरराव शंकरराव देसाई होते. प्रास्ताविक व स्वागत सोसायटीचे व्हा. चेअरमन अ‍ॅड. अनिल पावशे यांनी केले. कार्यक्रमात साहित्य भूषण पुरस्कार अ‍ॅड. नितीन धोंडीबा आनंदचे …

Read More »

निवडणूक आयोगाविरोधात शिवसेनेची दिल्ली हायकोर्टात धाव

  मुंबई : शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण अखेरीस आता दिल्ली हायकोर्टामध्ये सिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई …

Read More »

मराठीतून कागदपत्रे देण्यासंदर्भात हलगा ग्राम पंचायतीस निवेदन

  बेळगाव : हलगा येथील महाराष्ट्र एकीकरण महाराष्ट्र समिती व मराठी भाषिकांच्या वतीने ग्रामपंचायतला सर्व परिपत्रके, सरकारी कागदपत्रके मराठी भाषेत द्यावीत, असे निवेदन सोमवार दिनांक 10 रोजी ग्रामपंचायत सेक्रेटरी जोसेफ फर्नांडिस यांना देण्यात आले. हे निवेदन देतेवेळी मनोहर संताजी म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठी भाषिक 21 टक्के पेक्षा जास्त आहेत, …

Read More »

मुलायम सिंह यादव यांचे निधन

लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचं गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण …

Read More »