Monday , September 21 2026
Breaking News

शिवसेनेचं नवं चिन्ह क्रांती घडवून आणेल : संजय राऊत

Spread the love

 

मुंबई : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासही मज्जाव केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात शिरण्यापूर्वी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी संजय राऊत यांनी ’हौसले बुलंद है’ अशा धाटणीची प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेनेचं नवं चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल. यापूर्वी देशात ज्या पक्षांची चिन्ह गोठवण्यात आली, ते पक्ष पुढे जाऊन मोठे झाले. आम्हीदेखील तसेच मोठे होऊ. आमच्यात असलेलं शिवसेनेचं स्पिरीट (इच्छाशक्ती) अजूनही हाय आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने आम्हाला कोणातही फरक पडत नाही. आम्ही नव्या जोमाने काम करु. आम्ही पक्षाचे नवे चिन्ह आणि पक्षाचे नवीन नाव लोकांपर्यंत पोहोचवू, अशा आशावाद संजय राऊत यांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *