Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

खानापूरातील पर्यटन स्थळांना विकासाची आतुरता

खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेला जांबोटी, कणकुंबी परिसर आहे. पर्यटनाचा खजिना असूनही आतापर्यंत दुर्लक्षितच आहे. येथील स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होते. अशी स्थळे विकसित करून पर्यटकापर्यंत पोहोचविल्यास शासनाच्या महसुलात नक्कीच वाढ होणार आहे. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पण …

Read More »

आता नोव्हेंबरमध्ये सीमाप्रश्नी सुनावणी!

  नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आता नोव्हेंबर महिन्यात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (30 ऑगस्ट) बेळगाव सीमाप्रश्नी सुनावणी झाली. त्यावेळी कर्नाटकच्या वकिलांनी वेळ मागितल्याने पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. न्यायमूर्ती जोसेफ यांच्या त्री सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने न्यायालयात वकील राकेश द्विवेदी आणि शिवाजीराव …

Read More »

माणिकवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन….

  खानापूर : के. एल. ई. तांत्रिक महाविद्यालय बेळगाव आणि प्रा. शंकर आप्पाणा गावडा, सौ. प्रिती परशराम गोरल, ग्रा. पं. सदस्य माणिकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महालक्ष्मी ग्रुपचे प्रमुख श्री. विठ्ठलराव सोमाना हलगेकर, प्रमुख अतिथी म्हणून म. ए. समितीचे नेते …

Read More »

अडीच हजार नारळापासून साकारली गणेश मूर्ती

महादेव गल्ली गणेशोत्सव मंडळ:  आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी : येथील महादेव गल्ली गणेशोत्सव मंडळांचे यंदा ५१ वे वर्ष आहे. त्यानिमित्त बुधवारपासून (ता.३१) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी अडीच हजार नारळापासून सात दिवस मेहनत घेऊन ११ फुट गणेश मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती यावर्षीचे खास आकर्षण ठरली …

Read More »

आज तब्बल पाच वर्षांनंतर सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

  नवी दिल्ली : स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्न अद्याप प्रलंबित आहे. सीमेवरील बेळगाव, निपाणीसह अनेक भाग हा मराठी भाषिकांचं प्राबल्य असणारा आहे. त्यामुळे हे भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी तेथील नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून लढा देत आहेत. या पार्श्वभूमीवर आज जवळपास पाच वर्षांनंतर बेळगावच्या मुद्द्यावर सर्वोच्च …

Read More »

निपाणी मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य

युवा नेते उत्तम पाटील : माणकापुरात गॅसकिटचे वितरण निपाणी(वार्ता) मतदार संघात कुठलेही काम , कुठल्याही योजना सत्ताधरी गटाच्या माध्यमातूनच करण्यात येतील असे वातावरण तयार करण्यात आले आहे. शिक्षण, आरोग्य, महसूल खाते अथवा पोलीस खाते आदीतील सर्व कामे सत्ताधरी गटाच्या मर्जीने करण्यास सांगितले जाते आहे. गेल्या दोन अडीच वर्षात खालच्या पातळीवरचे …

Read More »

संकेश्वरात सोयाबीनचा “भाव” घसरला…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर भागात नविन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळालेले दिसत आहे. संकेश्वर-गडहिंग्लज रस्ता येथील श्री शंकरलिंग ट्रेडर्सचे मालक आकाश खाडे यांनी सोयाबीन पूजनांने नविन सोयाबीन खरेदीचा शुभारंभ केलेला दिसत आहे. संकेश्वरातील शेतकरी अनिल रजपूत यांनी प्रथम सोयाबीन विक्रीचा मान …

Read More »

निलगारचे शुक्रवारी दर्शन : शिवपूत्र हेद्दुरशेट्टी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीचे दर्शन शुक्रवार दि. २ सप्टेंबर २०२२ पासून सुरू केले जाणार असल्याचे निलगार गणपतीचे प्रमुख शिवपुत्र हेद्दुरशेट्टी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे भक्तगणांना निलगार गणपतीचे दर्शन घेता आलेले नाही. त्यामुळे यंदा गर्दी होण्याची शक्यता …

Read More »

श्रेष्ठ भारत युवकांच्या हाती : चक्रवर्ती सुलीबेले

  संकेश्वर (महंमद मोमीन) : युवकांनी भारताला श्रेष्ठ बनविणेचे कार्य करायला हवे असल्याचे वक्ते चक्रवर्ती सुलीबेले यांनी सांगितले. ते संकेश्वर नवभारत बळगतर्फे नेसरी गार्डन डिलक्स येथे आयोजित युवा मेळाव्याला उद्देशून बोलत होते. प्रारंभी मेळाव्याचे उदघाटन बेळगांव रामकृष्ण मिशनचे सेक्रेटरी स्वामी आत्मपरानंदजी महाराज, स्वामी त्यागीस्वरानंदजी महाराज (दावणगिरी) वक्ते चक्रवर्ती सुलीबेले यांचे …

Read More »

नूतन मराठी विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेमध्ये यश 

निपाणी (वार्ता) : येथे झालेल्या निपाणी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ निपाणी संचलित नूतन मराठी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. यामध्ये उत्कर्ष कांबळे 400 मीटर धावणे मध्ये प्रथम, जैद हवालदार 100 मीटर धावणे द्वितीय व 200 मीटर धावणे तृतीय, समर्थ बाबर 1500 मीटर धावणे तृतीय, प्रथमेश …

Read More »