Tuesday , June 2 2026
Breaking News

निलगारचे शुक्रवारी दर्शन : शिवपूत्र हेद्दुरशेट्टी

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीचे दर्शन शुक्रवार दि. २ सप्टेंबर २०२२ पासून सुरू केले जाणार असल्याचे निलगार गणपतीचे प्रमुख शिवपुत्र हेद्दुरशेट्टी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे भक्तगणांना निलगार गणपतीचे दर्शन घेता आलेले नाही. त्यामुळे यंदा गर्दी होण्याची शक्यता आहे. भक्तगणांसाठी निलगार गणपतीचे दर्शन शुक्रवार दि. २ सप्टेंबर २०२२ खुले राहणार आहे. भक्तगणांनी निलगार गणपतीचे दर्शन रांगेत उभे राहून समाधानाने घेण्याचे कार्य करायला हवे आहे. श्री गणेश चतुर्थी दिनी निलगार गणपतीचे आगमन होते. या दिवशी निलगार गणपती हेद्दुरशेट्टी परिवाराच्या मजल्या घरात ठेवून हेद्दुरशेट्टी परिवाराचे लोक परंपरागत पद्धतीने पूजा अर्चा करतात. त्यामुळे या दिवशी भक्तगणांनी दर्शनासाठी येऊ नये. १ सप्टेंबर २०२२ रोजी निलगार गणपतीचे स्वस्थानी प्रतिष्ठापना करुन आरस केले जाणार असल्याने निलगारचे दर्शन दि. २ सप्टेंबरपासून सुरू करणेचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विरभद्र हेद्दुरशेट्टी, हनुमंत हेद्दुरशेट्टी उपस्थित होते.
निलगार गणेशोत्सवाची जय्यत तयारी…
संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीची महिमा सर्व दूर पसरली आहे. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश आदी राज्यांतील लाखो भक्तगण निलगार गणपती दर्शनासाठी येतात. निलगार गणेशोत्सव प्रारंभ होत असल्याने आझाद रस्ता ते हेद्दुरशेट्टी निवासस्थानापर्यंत दोहो बाजुंनी पेढे, स्टाॅल, पूजा साहित्याची दुकाने, खेळणीची दुकाने, स्टेशनरी दुकाने आकर्षकरित्या थाटली जातात. दुकानांसाठी जागेची बुकींग सुरू असून दुकाने थाटणेचे काम प्रारंभ झालेले दिसत आहे.

About Belgaum Varta

Check Also

आई आणि मुलाचा संकेश्वरजवळील हिरण्यकेशी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Spread the love  संकेश्वर : आई आणि मुलाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *