Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

पीक नुकसान भरपाई त्वरित मिळावी

  राजू पोवार : रयत संघटनेतर्फे निपाणी तहसिलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : डोणेवाडी येथील अनुष्का भेंडे प्रकरण, निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबीन, मका, भूईमुग, भात, ऊस व इतर कडधान्ये पिके यांचे नुकसान झाले आहे. त्याचा ताबडतोब सर्वे करून शेतकर्‍यांना एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रयत संघटनेतर्फे …

Read More »

श्रीकांत पाटील ’शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

  चंदगड : कालकुंद्री ता. चंदगड गावचे सुपुत्र व कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांना ’शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे नुकतेच थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शामरंजन बहुउद्देशीय फाउंडेशन मुंबईच्या वतीने …

Read More »

अखेर खानापूर-रामनगर महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात

खानापूर : खानापूर रामनगर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरावस्थेसंदर्भात शिंदोली ग्राम पंचायतच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन तसेच खानापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जाऊन जाब विचारून त्यांना धारेवर धरण्यात आले होते. त्यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जाऊन रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. तातडीने नवीन कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराशी संपर्क साधून दिला. त्यांना रस्त्याच्या दयनीय …

Read More »

कुप्पटगिरी नाल्यावरील पूल खचल्याने वाहतुक ठप्प

  खानापूर (प्रतिनिधी) : कुप्पटगिरी (ता. खानापूर) गावाच्या नाल्यावरील पूल गेल्या महिनाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे खचल्याने कुप्पटगिरी गावाला या नाल्यावरून ये-जा होणारी वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे कुप्पटगिरी गावाच्या नागरिकांना खानापूर शहराला जाणारा जवळचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे कुप्पटगिरी नागरिकांना अनेक समस्या तोंड द्यावे लागत आहे. याची दखल घेऊन …

Read More »

आपच्या आमदारांना भाजपकडून 20 कोटींची ऑफर : खासदार संजय सिंह

  नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावरील कारवाईवरून आम आदमी पक्षाकडून पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकार काहीही करून दिल्लीतील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आमच्या आमदारांवर दबाव आणल्या जात आहे, असा आरोप …

Read More »

बिबट्याच्या शोधार्थ पुन्हा मोहीम सुरु

  बेळगाव : बिबट्याला जेरबंद पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. यासाठी सकरेबैल येथून 2 हत्ती दाखल झाले. त्यांच्या सहाय्याने आज सकाळपासूनच बिबट्यासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. गेल्या 20 दिवसांपासून गोल्फ कोर्स मैदान परिसरात असलेल्या आणि बेळगावकरांची झोप उडवलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आता हत्तीची मदत घेण्यात येत …

Read More »

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांत राडा

विधानभवनाबाहेर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की मुंबई : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने वातावरण तापलं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांनी एकमेकाला धक्काबुक्की केली. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे …

Read More »

‘नारायणी’ची सुरेल संगीत सभा

बेळगाव : राग-रागिण्यांची झाली बरसात तबला-संवादिनीची झकास साथ चिंब, मनविभोर श्रावण डोलले अवघे श्रोतृजन बेळगाव शांतीनगरातील संगीत शिक्षक गुरुराज कुलकर्णी संचालित नारायणी संगीत विद्यालय आणि पं. बी. व्ही. कडलास्कर बुवा जन्मशताब्दीनिमित्त संगीत सभा कार्यक्रम सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात दि. 21 रोजी पार पडला. याला स्मृती समारोह समितीचे सहकार्य लाभले होते. यामध्ये …

Read More »

चिक्कोडीत पुन्हा बिबट्याची दहशत

  चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत सुरू झाली आहे. बिबट्याने म्हशीच्या वासरावर हल्ला करून त्याची शिकार केल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली. मंगळवारी रात्री उशिरा बिबट्याने इंगळी गावातील शेतकरी कृष्णा जाधव यांच्या 2 वर्षाच्या म्हशीच्या वासरावर हल्ला केला. वासराच्या पोटाचा काही भाग फाडला. त्यामुळे वासराचा …

Read More »

उच्च न्यायालयाने ‘अजान’ विरोधातील याचिका फेटाळली; इतर धर्माच्या अधिकारांचे उल्लंघन नाही

  बंगळूर : राज्य उच्च न्यायालयाने सोमवारी राज्यातील मशिदींना लाऊडस्पीकरद्वारे “अजानची सामग्री” वापरण्यापासून रोखण्याचे निर्देश मागणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. सार्वजनिक जनहित याचिका (पीआयएल) मध्ये म्हटले आहे की, दिवसातून पाच वेळा लाऊडस्पीकरद्वारे अजान (इस्लाममध्ये प्रार्थना करण्याचे आवाहन) संपूर्ण वर्षभर सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत इतर धर्माच्या श्रद्धावानांच्या …

Read More »