Sunday , July 26 2026
Breaking News

चिक्कोडीत पुन्हा बिबट्याची दहशत

Spread the love

 

चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत सुरू झाली आहे. बिबट्याने म्हशीच्या वासरावर हल्ला करून त्याची शिकार केल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली.
मंगळवारी रात्री उशिरा बिबट्याने इंगळी गावातील शेतकरी कृष्णा जाधव यांच्या 2 वर्षाच्या म्हशीच्या वासरावर हल्ला केला. वासराच्या पोटाचा काही भाग फाडला. त्यामुळे वासराचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

सदलग्यात विद्युत कंपनीच्या खाजगीकरणाविरोधात शेतकऱ्यांचा पाठिंबा

Spread the love  सदलगा : सदलगा येथे आज येथील समस्त शेतकऱ्यांनी एकत्रितपणे कर्नाटक राज्य विद्युत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *