Monday , April 20 2026
Breaking News

पीक नुकसान भरपाई त्वरित मिळावी

Spread the love

 

राजू पोवार : रयत संघटनेतर्फे निपाणी तहसिलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : डोणेवाडी येथील अनुष्का भेंडे प्रकरण, निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबीन, मका, भूईमुग, भात, ऊस व इतर कडधान्ये पिके यांचे नुकसान झाले आहे. त्याचा ताबडतोब सर्वे करून शेतकर्‍यांना एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रयत संघटनेतर्फे कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता.23) निवेदन देण्यात आले.
रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे निपाणी तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. पण आजपर्यंत प्रशासनातर्फे नुकसानीचा सर्वे झालेला नाही. तर दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे घर आणि पिकांचे नुकसान होऊनही त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सर्वच नुकसान असताना तात्काळ भरपाई मिळावी. अन्यथा नुकसानग्रस्तांचा लढा उभारला जाईल असा इशारा पोवार यांनी दिला आहे.
तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठापर्यंत पोचवून तात्काळ भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी रयत संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश पाटील, शहर अध्यक्ष उमेश भारमल, उपाध्यक्ष सर्जेराव हेगडे, सेक्रेटरी भगवंत गायकवाड, हालाप्पा ढवणे, सुनील गाडिवड्डर, विजय गुरव, कुमार पाटील, बाबासाहेब पाटील, बबनराव जामदार, पवनकुमार माने, शिवगोंड निकम, रमेश गळतगे, अनंत पाटील, रमेश भोसले, चिनू कुळवमोडे, बाळूअण्णा, पाटील, राजाराम पाटील, शिवाजी वाडेकर, बाळू कांबळे, विठ्ठल रजपूत, संजय नाईक, एकनाथ सादळकर, तानाजी पाटील, सदाशिव शेटके यांच्यासह ग्रामीण भागातील रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे रविवारी (ता.१९) शिवजयंती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *