Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

श्रीराम सेनेची एसडीपीआय, पीएफआयवर बंदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने!

  बेळगाव : श्रीराम सेनेतर्फे एसडीपीआय आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत एसडीपीआय आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना रवी कोकितकर म्हणाले, एसडीपीआय आणि …

Read More »

जाधवनगरात बिबट्याचा संचार

  बेळगाव : जाधवनगरमध्ये आज बिबट्या निदर्शनास आल्याने एकच घबराट पसरली. जाधवनगर येथे गवंडी काम करत असता एकावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे समजते. सुदैवाने तो थोडक्यात बचावला आहे. या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जाधवनगर येथे अचानक एक बिबट्या प्रकट झाल्यामुळे रहिवाशांची घाबरगुंडी उडाली. जाधवनगर येथील कुट्रे बिल्डिंगसमोर …

Read More »

अपुर्‍या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल!

  बेळगाव : खानापूरसह बेळगांव तालुक्यातील हजारो विद्यार्थी बेळगांव शहरात शिक्षणासाठी ये-जा करत असतात. मात्र अपुर्‍या बस सेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. लांब पल्ल्याच्या बस आधीच क्षमतेपेक्षा जास्त भरून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये जागाच मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना बसच्या दाराजवळ लोंबकळत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे त्रास लक्षात …

Read More »

गर्लगुंजीतून ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : गोपाळ पाटील यांचे आवाहन

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक सरकारकडून भाषिक अल्पसंख्याक कायद्याची पायमल्ली होत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने येत्या 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. या ठिय्या आंदोलनाला गर्लगुंजी भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून कर्नाटक सरकारला जाग आणावी, असे आवाहन खानापूर …

Read More »

संकेश्वर येथे “बर्निंग” कार

  संकेश्वर : बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर शहरात शुक्रवारी सकाळी एक मारुती ओम्नी कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. बस स्थानकाजवळ येताच कारमधून धूर येत असल्याचे दिसत होते. लागलीच गाडीतील सर्व प्रवासी बाहेर पडले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. नागरिकांच्या माहितीवरून अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून …

Read More »

महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन : राहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. देशभरात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्ली, मुंबई, नागपूरसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात …

Read More »

खानापुरात लवकरच शाहिरी, भजन-भारुड कार्यशाळा

  खानापूर (विनायक कुंभार) : लोकसंस्कृती नाट्य कला खानापूर संस्थेच्या वतीने तालुकास्तरावर शाहिरी, भजन-भारुड कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष अभिजीत कालेकर व ढोलकी पट्टू ज्ञानेश्वर सतार यांनी औरंगाबाद येथील शाहीर अजिंक्य लिंगायत व भारुडरत्न कैं. निरंजन भाकरे यांचे सुपुत्र शेखर भाकरे यांची भेट घेतली. सीमाभागात अनेक लोककला …

Read More »

हलशीत नागरिकांची एटीएमअभावी गैरसोय

  खानापूर (विनायक कुंभार) : भात पिकाच्या उत्पादनात अग्रेसर असणार्‍या या परिसरात एटीएमची व्यवस्था नसल्याने येथील नागरिकांची तसेच व्यापर्‍यांची फार मोठी समस्या होत असून हलशी येथे एटीएम मशीन उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तालुक्यातील मोठं गाव म्हणून ओळखले जाणारे हे गाव येथे एटीएम उपलब्ध नसल्याने नागरिकांना रक्कम काढण्यासाठी …

Read More »

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक रविवारी

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक रविवार दि. 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता सिद्धनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक सभागृह (शनिमंदिरजवळ) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडूस्कर व सरचिटणीस शिवराज …

Read More »

व्याजदरांमध्ये आरबीआयकडून अर्ध्या टक्क्याची वाढ; गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार

  नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट 5.4 टक्के इतका झाला आहे. शुक्रवारी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची किंवा जीडीपीची वाढ 7.2 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत …

Read More »