Monday , September 21 2026
Breaking News

जाधवनगरात बिबट्याचा संचार

Spread the love

 

बेळगाव : जाधवनगरमध्ये आज बिबट्या निदर्शनास आल्याने एकच घबराट पसरली. जाधवनगर येथे गवंडी काम करत असता एकावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे समजते. सुदैवाने तो थोडक्यात बचावला आहे. या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जाधवनगर येथे अचानक एक बिबट्या प्रकट झाल्यामुळे रहिवाशांची घाबरगुंडी उडाली. जाधवनगर येथील कुट्रे बिल्डिंगसमोर सिद्धराय लक्ष्मण निलजकर राहणार सावगाव यांच्यासमोर बिबट्या प्रकट झाल्याने तेथे काम करणारे कामगार घाबरून सैरावैरा पळत सुटले. बिबट्याने एकावर हल्ला केला. त्याच्या पाठीवर बिबट्याने वार केले. सुदैवाने ते बचावले.
घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि वन विभागाचे कर्मचारी तसेच एपीएमसी पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. आजूबाजूच्या घरांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बिबट्या आडवा आल्याचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *