Monday , September 21 2026
Breaking News

हलशीत नागरिकांची एटीएमअभावी गैरसोय

Spread the love

 

खानापूर (विनायक कुंभार) : भात पिकाच्या उत्पादनात अग्रेसर असणार्‍या या परिसरात एटीएमची व्यवस्था नसल्याने येथील नागरिकांची तसेच व्यापर्‍यांची फार मोठी समस्या होत असून हलशी येथे एटीएम मशीन उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
तालुक्यातील मोठं गाव म्हणून ओळखले जाणारे हे गाव येथे एटीएम उपलब्ध नसल्याने नागरिकांना रक्कम काढण्यासाठी नंदगड, बिडी किंवा खानापुरात यावे लागते. हलशीत एटीएम सेवा उपलब्ध झाल्यास या परिसरातील गावांना लाभ होईल. याची नोंद तातडीने घेऊन एटीएम सुरू करण्यात यावे, यासाठी काही दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी राष्ट्रीय बँकांच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन एटीएम सुरू करण्याची मागणी केली होती.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *