Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

अथणी येथे कालव्यात आढळला मृतदेह

  बेळगाव : अथणी येथील पाटबंधारे कालव्यात संशयास्पदरित्या एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी या तालुक्यातील यक्कंची या गावातील पाटबंधारे योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामकाजातील कालव्यात एका युवकाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. सदर बाब लक्षात येताच गळी पोलीस स्थानकात ग्रामस्थांनी माहिती दिली असून तातडीने बचावकार्य पथक …

Read More »

उमेश उदय काळे यांना पीएचडी प्रदान

बेळगाव : अनगोळ रोड वरील नागरिक आणि अंगडी कॉलेजचे प्राध्यापक श्री. उमेश उदय काळे यांना कर्नाटक विश्वविद्यालयातर्फे पीएचडी ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. डोमेस्टिक वॉटर मॅनेजमेंट इन बेळगाव या विषयावर त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाला ही पीएचडी देण्यात आली आहे. त्यांना डॉ. एच. एस. भरडी यांचे मार्गदर्शन लाभले असून ते …

Read More »

‘स्वरगंध’चा स्वरांकित गुरुवंदना सोहळा; विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गाण्यांमुळे श्रोते मंत्रमुग्ध

गुरुवंदनेचा हृद्य सोहळा स्वरगंध दरवळला गायन-वादन कल्लोळ झाला जणू नादब्रह्म अवतरला… असेच काहीसे वर्णन गुरुवंदना या कार्यक्रमाचे करावे लागेल. शहापूर कचेरी गल्लीतील स्वरगंध विद्यालयातर्फे दि. 24 रोजी सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यालयाच्या विविध वयोगटातील शिष्यांनी सरस गाणी सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. विद्यालयाच्या संचालिका सौ. भाग्यश्री …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांचा विकास; मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन

कोगनोळी : चूल आणि मूल यातून महिलांनी बाहेर पडून उद्योग व्यवसाय केला पाहिजे. शिक्षणाबरोबर संस्कार शिकले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांचा विकास झाला असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले. येथील प्रियंका संकेश्वरे व महेश संकेश्वरे या दाम्पत्यांना मंत्री जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून १० लाख रुपये मंजूर झालेल्या बेकरी …

Read More »

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींची आज पुन्हा चौकशी; काँग्रेसची देशभर निदर्शने

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी केली जाणार आहे. काँग्रेसकडून देशभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तर मुंबईतही मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, आज सोनिया गांधींची दुसऱ्यांदा ईडी चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी ईडीनं गुरुवारी (21 …

Read More »

कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच अधिकाऱ्यांमध्ये माणुसकीही महत्त्वाची : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

  बेळगाव : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात जाऊन ऑटो आणि टिम्पो ट्रॅव्हलर्स चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत परिवहन आयुक्त आणि वरिष्ठ प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ऑटो चालक आणि टेम्पो चालक हे कष्टकरी आहेत. कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच वाहन कर्ज फेडावे लागते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना कायदेशीर …

Read More »

संशयित दहशतवादी अख्तरला बंगळूरात अटक; त्याच्या संपर्कातील अन्य तिघांनाही ताब्यात

  बंगळूर : सुशिक्षित शहर म्हणून ओळखले जाणारे राजधानी बंगळुर शहर आता दहशतवाद्यांचे अड्डे बनत असल्याची भीती व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूरमध्ये एका दहशतवाद्याला पकडल्यानंतर सीसीबी पोलिसांनी काल रात्री (रविवारी) टिळक नगरमध्ये लपून बसलेल्या एका संशयित दहशतवाद्याला पकडले आहे. शहर पोलिस आयुक्त प्रताप रेड्डी यांनी सांगितले की, टिळकनगर येथे …

Read More »

गोकाक पोलिसांकडून मंगळसूत्र चोरीचा तपास; दोघांना अटक

मंगळसूत्र, दोन दुचाकी अंदाजे किंमत 3 लाख 55 हजार रुपये जप्त संकेश्वर (महंमद मोमीन) : गोकाक गावात गेल्या महिनाभरापासून झालेल्या चोरीचा तपास लावण्यात गोकाक पोलिसांना यश मिळाले आहे. गोकाक पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल आर. राठोड यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून दोघा चोरांना गजाआड करुन ५० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, दोन दुचाकी …

Read More »

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय महिला बॉक्सरचा मानसिक छळ!

  नवी दिल्ली : राष्ट्रकुल 2022 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सिंगपटू लवलीना बोरगोहेनने गंभीर आरोप केला आहे. राजकारणामुळे तयारीवर वाईट परिणाम झाला असून मानसिक छळ सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप लवलीना हिने केला आहे. सोमवारी 25 जुलैला सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिने आपली व्यथा जगासमोर मांडली आहे. लवलीना …

Read More »

संकेश्वरात पोलीस अधिकारी रवि चन्नण्णावर यांचा वाढदिवस नोटबूक वाटपाने साजरा

  संकेश्वर (महंमद मोमीन) : बेंगळूरचे वरीष्ठ पोलिस अधिकारी (आय पी.एस.) रवि डी. चन्नण्णावर यांचा वाढदिवस संकेश्वरातील त्यांचे अभिमानी गिरीश निडसोसी यांनी सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ५०० नोटबूक वितरणांने उत्साही वातावरणात साजरा केला. वह्या वाटप कार्यक्रमाविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गिरीश निडसोसी म्हणाले, आमचे लाडके वरीष्ठ पोलिस अधिकारी रवि डी. चन्नण्णावर …

Read More »