Thursday , June 4 2026
Breaking News

‘स्वरगंध’चा स्वरांकित गुरुवंदना सोहळा; विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गाण्यांमुळे श्रोते मंत्रमुग्ध

Spread the love

गुरुवंदनेचा हृद्य सोहळा
स्वरगंध दरवळला
गायन-वादन कल्लोळ झाला
जणू नादब्रह्म अवतरला…
असेच काहीसे वर्णन गुरुवंदना या कार्यक्रमाचे करावे लागेल. शहापूर कचेरी गल्लीतील स्वरगंध विद्यालयातर्फे दि. 24 रोजी सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यालयाच्या विविध वयोगटातील शिष्यांनी सरस गाणी सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. विद्यालयाच्या संचालिका सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी संवादिनी तर जितेंद्र साबण्णावर यांनी तबल्याची साथसंगत केली.
तत्पूर्वी सरस्वती पूजा करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सकस लेखक किशोर काकडे उपस्थित होते. ते म्हणाले की, अंगाई गीत हे जीवनातील पहिले संगीत असते. शास्त्रोक्त संगीत शिकण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी याचा ध्यास घेतला पाहिजे. सध्याचे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहे. मुलांनीही यात सहभागी व्हावे, असे काकडे म्हणाले. तसेच त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव सांगत गुरुची महिमा विशद केली. त्यांचा व साबण्णावर यांचा सन्मान करण्यात आला. शिष्यांतर्फे सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यानंतर सुमारे साडेतीन तास संगीत कार्यक्रम झाला. यामध्ये गणेश गीत, आईसारखे दैवत झाले, हिची चाल तुरुतुरु, कन्नड गीत उत्तुंग नाडी निंद, राग बिहारमधील भावगीत, दिल्या घेतल्या वचनांची, एक नाही दोन नाही हे बालगीत, चांदोबा चांदोबा, यमन रागावर आधारित एक भक्तिगीत, का रे दुरावा, विठू माउली तू, जिथे सागरा धरणी मिळते, अधिर मन झाले, हिच आमची प्रार्थना, देह शुद्ध करुनी ही गाणी विद्यार्थ्यांनी सादर केली. यानंतर विद्यालयाच्या महिला भजनी मंडळाने भारुड, लख पडला प्रकाश, विठ्ठलाच्या पायी थरारली वीट, गुरुविण नाही दुजा आधार, चांदण चांदण झाली रात्र, वारियाने कुंडल हाले (गवळण), दत्ताचे भजन, चंदनाचे हात, पायही चंदन ही गाणी सादर केली. यानंतर सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी भैरवीमध्ये सोनियाचा धेनू वर्षे अमृताचा घनू हे गाणे गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. पत्रकार सुनील आपटे यांनी विविध किस्से सांगत छानसे सूत्रसंचालन केले. भक्ती धोंगडी यांनी कॅसिओची साथ केली. सौ. कुलकर्णी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान

Spread the love  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *