Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

शहरातील लेंडी नाला साफसफाईला प्रारंभ

बेळगाव : गेल्या तीन-चार वर्षापासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाल्यांची सफाई केली जाते. त्यानुसार सध्या लेंडी नाला सफाईचे काम हाती घेण्यात आले असून त्यानंतर बळ्ळारी नाला स्वच्छ केला जाईल, माहिती शहराचे आमदार अनिल बेनके यांनी दिली. पावसाळ्यात शहरातील पाण्याचा निचरा होण्यामध्ये लेंडी नाला हा महत्त्वाची …

Read More »

टॅक्स प्रॅक्टिशनर्स : उद्या अधिकारग्रहण सोहळा

बेळगाव : बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या 2022 -23 सालच्या व्यवस्थापकीय समितीचा अधिकारग्रहण सोहळा येत्या शुक्रवार दि. 13 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. टिळकवाडी तिसर्‍या रेल्वे गेट नजीक असलेल्या हॉटेल संतोरिनी येथे येत्या शुक्रवारी सायंकाळी 8:30 वाजता हा अधिकार ग्रहण सोहळा होणार आहे. सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य …

Read More »

संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना

पुणे : मी आतापर्यंत समाजाच्या हितासाठी लढलो आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून मला खासदारकी मिळाली. त्यामध्ये अनेक कामं करता आली. समाजासाठी कामे करायची असेल तर सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे मी येत्या काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, असं छत्रपती संभाजी …

Read More »

बेळगाव ग्रामीण भागात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत नविन 3000 गॅस शेगडी कनेक्शन वितरण

बेळगाव : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील महत्त्वाकांक्षी महिलांसाठी उज्ज्वला योजना अंतर्गत बेळगांव ग्रामीणमधील कंग्राळी खुर्द, मोठी कंग्राळी,-आंबेवाडी, मण्णुर, गोजगे, उचंगाव,-सुळगा, बेक्किनकीरे, तुरमुरी, कुद्रेमनी, बेळगुंदी, बिजगर्णी, बेनकनहळ्ळी व सांवगाव या गावातील महिलांना मोफत गॅस शेगडी कनेक्शन वितरण करण्यात आले. बेळगांव लोकसभा खासदार श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांच्या मार्गदर्शनाखाली व …

Read More »

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश

बेळगाव : गंगावती कोप्पळ येथे नुकत्याच पार पडलेल्या 5 व्या ऑल इंडिया इन्व्हिटेश्नल कराटे चॅम्पियनशिप -2022 या राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटुंनी घवघवीत यश संपादन केले आहे. गंगावती कोप्पळ (कर्नाटक) येथील केबीएन गार्डन क्रीडा संकुलामध्ये उपरोक्त राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेचे अलीकडेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इंडियन कराटे क्लब बेळगाव …

Read More »

250 लाख अनुदानामध्ये बेळगांव शहरात विकासकामांना आमदार अनिल बेनके यांच्याकडून भुमिपुजनाने सुरूवात

बेळगांव : बुधवार दिनांक 11 मे 2022 रोजी बेळगांवमध्ये एकुण 250 लाख अनुदानातून बेळगांव उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी रोड पुन:डांबरीकरण, सीडी ड्रेन, सीसी रोड अशा अनेक विकासकामांना भुमिपुजनाने सुरुवात केली. या संदर्भात बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, बेळगांव शहरात सध्या विकासकामे चालु स्थितीत आहेत तर काही पुर्ण …

Read More »

जायंट्स ग्रुप परिवारच्यावतीने मातृदिन सन्मान सोहळा संपन्न

बेळगाव : आंतरराष्ट्रीय मातृदिनानिमित्त बेळगावच्या जायंट्स ग्रुप बेळगाव परिवार वतीने बुधवार दिनांक 11 मे रोजी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला करण्यात आला होता. या कार्यक्रमात आदर्शमातांचा सन्मान करण्यात आला. भारत नगर शहापूर लक्ष्मी रोड येथील गणेश मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला जायंट्स परिवार अध्यक्ष श्रीधन मलिक, जायंट्स फेडरेशनचे माजी …

Read More »

दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवर ८ गडी राखून विजय

मुंबई : आयपीएल २०२२ चा ५८ वा सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा ८ गडी राखून पराभव केला. मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ६ बाद १६० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग …

Read More »

गुरुवंदना कार्यक्रमाची जय्यत तयारी

बेळगाव : सकल मराठा समाजाच्यावतीने रविवार दि. 15 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मराठा समाजाचे नेते आणि कार्यकर्ते विविध भागात जनजागृती करत आहेत. सदर कार्यक्रमासाठी बेळगावसह खानापूर, संकेश्वर, निपाणी आदी भागातून मराठा समाज एकत्र येणार आहे. त्यामुळे बेळगावात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात …

Read More »

कार – दुचाकी अपघातात दोघे जण जखमी

निपाणी (वार्ता) : येथील अकोळ क्रॉस छत्रपती शिवाजी सांस्कृतिक भवनासमोर भरधाव दुचाकीने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.११) घडली. हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात उदय पाटील (वय १८), सौरभ पाटील (वय २३) दोघेही रा. म्हसोबा हिटणी ता. …

Read More »