Sunday , July 26 2026
Breaking News

कार – दुचाकी अपघातात दोघे जण जखमी

Spread the love
निपाणी (वार्ता) : येथील अकोळ क्रॉस छत्रपती शिवाजी सांस्कृतिक भवनासमोर भरधाव दुचाकीने कारला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे युवक जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.११) घडली. हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात उदय पाटील (वय १८), सौरभ पाटील (वय २३) दोघेही रा. म्हसोबा हिटणी ता. हुकेरी हे युवक जखमी झाले आहेत.
याबाबत तुम्ही पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,  निपाणी- गळतगा या आंतरराज्य रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्हणशेट्टी पार्क रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. अपघातग्रस्त कार अकोळ क्रॉस रस्त्याकडे वळण घेत असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची कारला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेत दुचाकीसह कारचेही नुकसान झाले. बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंदी कॅरकट्टी आणि सहकाऱ्यांनी दोन्ही वाहने ताब्यात घेऊन पुढील चौकशी चालवला आहे. बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *