Thursday , June 4 2026
Breaking News

शहरातील लेंडी नाला साफसफाईला प्रारंभ

Spread the love

बेळगाव : गेल्या तीन-चार वर्षापासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाल्यांची सफाई केली जाते. त्यानुसार सध्या लेंडी नाला सफाईचे काम हाती घेण्यात आले असून त्यानंतर बळ्ळारी नाला स्वच्छ केला जाईल, माहिती शहराचे आमदार अनिल बेनके यांनी दिली.

पावसाळ्यात शहरातील पाण्याचा निचरा होण्यामध्ये लेंडी नाला हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. शास्त्रीनगर वगैरे शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणारा हा नाला बळ्ळारी नाल्याला मिळतो. पूर्वी पावसाळ्यात शहरात बर्‍याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत होती.
याला जाळ साचण्यासह झाडेझुडपे आणि कचर्‍यामुळे तुंबणारे लेंडी नाल्यासह बळ्ळारी नाला तसेच शहर परिसरातील अन्य लहान-मोठे नाले कारणीभूत आहे ते लक्षात घेऊन बेळगाव उत्तरचे आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांनी गेल्या तीन -चार वर्षापासून प्रामुख्याने बेळ्ळारी नाला व लेंडी नाला यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई केली जाईल, यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार सध्या लेंडी नाल्याच्या साफसफाईला सुरुवात झाली आहे.
जेसीबीच्या सहाय्याने लेंडी नाल्यातील झाडेझुडपे तसेच गाळ काढण्याचे जोमाने सुरू आहे. हे काम येत्या 10-15 दिवसात पूर्ण होईल. लेंडी नाल्याच्या सफाई नंतर लगेच बळ्ळारी नाल्याच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे शहरातील गटारे तुंबण्याबरोबरच कांही भागांमध्ये घराघरात पाणी शिरून जी पूर परिस्थिती निर्माण होत होती, त्याला आळा बसणार आहे.
तरी नागरिकांसह शेतकरी बांधवांनी नाला सफाईच्या या कामास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अ‍ॅड. अनिल बेनके यांनी केले आहे. याप्रसंगी त्यांच्यासमवेत शेतकरी नेते नारायण सावंत, सुनील जाधव आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री ब्रह्मचैतन्य रुग्ण सेवा फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा उत्साहात

Spread the love  बेळगाव : गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *