Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

भाजपला 10 गुंठे जागा महापालिकेकडून मंजूर

बेळगाव : बेळगाव शहरातील धर्मनाथ सर्कल जवळील तब्बल 10 गुंठे जागा 77,62,500 रुपये किंमतीमध्ये भारतीय जनता पक्षाला देण्यात आली आहे. महानगरपालिकेने आपल्या मालकीची ही जागा भाजपचे कार्यालय बांधण्यासाठी दिली असून गेल्या 3 मार्च 2022 रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावे याबाबतचा दस्त झाला आहे. बेळगाव महापालिकेची धर्मनाथ सर्कल जवळील सीटीएस क्र. …

Read More »

हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा रविवारी

बेळगाव : हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा रविवारी (ता. 24) रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हलशी येथे मराठी शाळेची स्थापना करण्यात आली होती. तेंव्हापासून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे …

Read More »

मंगळुरू येथे मशिदीच्या डागडुजीदरम्यान सापडले मंदिराचे अवशेष!

प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन मंगळुरू : कर्नाटकमधील मंगळुरु येथील एका मशिदीच्या डागडुजीच्या कामाकाजाच्या वेळी मशिदीखाली हिंदू मंदिर सदृश्य असे काही अवशेष सापडले आहेत. मंगळुरुपासून काही अंतरावर असणार्‍या या मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्याची बातमी वार्‍यासारखी परसरली असून हा सारा प्रकार गुरुवारी समोर आल्याची माहिती एनआय या वृत्तसंस्थेने दिली. मिलाली येथील जुमा …

Read More »

जम्मूमध्ये भीषण चकमक; 4 दहशतवादी ठार, तर 1 जवान शहीद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या एक दिवस अगोदरच जम्मूमध्ये सुरक्षा आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले की, गोळीबारामध्ये एक सुरक्षा अधिकारी शहीद झाले आहेत. तर, 4 अधिकारी जखमी झालेली आहेत. तर या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मूमधील चढ्ढा कँप परिसरात शुक्रवारी सकाळी …

Read More »

कारागृहांना डिजिटल सुरक्षा व्यवस्था; आता कारागृह कर्मचार्‍यांच्या गणवेशावर कॅमेरा

बेंगळुर : राज्यातील 104 कारागृहांसह देशभरातील 1350 कारागृहांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी डिजिटल सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. तसेच कैद्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. गंभीर आरोपाखाली शिक्षा भोगणार्‍या कैद्यांना कारागृहामध्ये चोरट्या मार्गाने अनेक सुविधा दिल्या जात आहेत. तसेच अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी सरकारने ही योजना आखली आहे. कारागृहातील …

Read More »

राष्ट्रवादी अपंग सेल तालुका अध्यक्षपदी राजाराम जाधव यांची निवड

चंदगड : चंदगड तालुका राष्ट्रवादी अपंग सेलच्या अध्यक्षपदी जनतेच्या व अपंग बांधवांच्या समस्यांचा पाठपुरावा करून त्या सोडवण्यात प्रयत्नशील, देवरवाडी गावचे कार्य कुशल नेतृत्व व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री. राजाराम हिरामणी जाधव यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी. संदीप नागरदळेकर, तुकाराम पाटील, बाजीराव पाटील तर खजिनदार पदी यल्लापा सनदी यांची …

Read More »

अर्जुन स्पोर्ट्स हुबळी संघ शेट्टी स्मृती चषक टी-20 चा मानकरी

बेळगाव : के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित दुसऱ्या शेट्टी स्मृती चषक टी -20 क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद आज अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने पटकाविले. अंतिम सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी संघाने प्रतिस्पर्धी साईराज वॉरियर्स संघावर 5 धावांनी शानदार विजय मिळवला. कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर आज गुरुवारी साईराज वॉरियर्स आणि अर्जुन …

Read More »

कर्नाटकात ‘आप’ तिसरे सरकार स्थापन करेल : अरविंद केजरीवाल

बेंगळूर : दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आल्यानंतर आम आदमी पक्ष दक्षिणेकडील राज्य कर्नाटकात तिसरे सरकार स्थापन करेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ते गुरुवारी कर्नाटकात आम आदमी पक्षाच्या (आप) निवडणूक मोहिमेला सुरुवात करताना बोलत होते. नॅशनल कॉलेजच्या मैदानावर झालेल्या रॅलीत बोलताना केजरीवाल यांनी कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेने …

Read More »

हुतात्म्यांच्या वारसांना श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून मदत

बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या आजारी पत्नी लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुंबईच्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून उपचारासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना प्रकृती खालावल्यामुळे केएलई हॉस्पिटलमध्ये …

Read More »

‘ज्ञानदीप’तर्फे विविध विधायक उपक्रम राबविणार : वाय. पी. नाईक

बेळगाव : सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे सलग सोळा वर्षे सामाजिक विधायक उपक्रम राबविले जातात. मागील दोन वर्षे कोरोना काळात बंधने आली होती. मात्र आता शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार ज्ञानदीपतर्फे आयोजित बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी एस. आर. मांगले होते. ज्ञानदीपतर्फे यापूर्वी क्रीडा विभाग, …

Read More »