Saturday , April 18 2026
Breaking News

हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा रविवारी

Spread the love

बेळगाव : हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा रविवारी (ता. 24) रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात हलशी येथे मराठी शाळेची स्थापना करण्यात आली होती. तेंव्हापासून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व विद्यार्थी अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने एकवटणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अमृत महोत्सव सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली असून गुरुवारी कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला असून रविवारी सकाळी नऊ वाजता मारुती मंदिर येथून शोभा यात्रेला सुरुवात होणार आहे.
शोभायात्रेचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या अध्‍यक्षा मुनेरा संगोळी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पंचायतीचे उपाध्यक्ष संतोष हंजी यांच्या हस्ते बसवेश्वर देवालयाची पूजा तर प्रदीप पारीपत्तेदार नृसिंह वराह पूजन, सहदेव गुरव लक्ष्मी पूजन, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष श्रीकांत गुरव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याचे पूजन तसेच शिवाजी जाधव निवृत्त कार्यकारी अभियंता, फोंडा यांच्या हस्ते शोभायात्रेची सांगता होईल.
भाऊराव कुलकर्णी नगरीचे उदघाटन पुणे येथील विजय कुलकर्णी यांच्या हस्ते, शंकराव देसाई सभागृहाचे उदघाटन निवृत्त कार्यकारी अभियंता कोल्हापूर तर नृसिंह वराह व्यासपीठाचे उद्घाटन मऱ्याप्पा गुरव यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष सुभाष हट्टीकर असणार असून यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, गोपाळ पाटील महाराज हलगा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर अमृत महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख वक्ते म्हणून सातारा येथील ज्येष्ठ विचारवंत यशवंत पाटणे उपस्थित राहणार आहेत.
दुपारी 3 ते 6 या वेळेत विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार असून सहा वाजता प्रदीप सुतार यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक एल. डी. पाटील अमृत महोत्सवी सोहळा संयोजक कमिटीतर्फे करण्यात आले आहे

About Belgaum Varta

Check Also

माजी विद्यार्थ्यांनी दिली शाळेला ग्रंथालयाची भेट

Spread the love  खानापूर : नंदगड (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक संत मेलगे शाळेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *