Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

बेळगावात राष्ट्रकवी कुवेम्पू जन्मदिनाचे आचरण

बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरात आज राष्ट्रकवी कुवेम्पू यांच्या जन्मदिनाचे आचरण करण्यात आले होतेबेळगावच्या बसवराज कट्टीमनी सभागृहात जिल्हाप्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका तसेच कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रकवी कुवेम्पू यांच्या जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येणार विश्वमानव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय …

Read More »

काकतकर महाविद्यालयात 64 विद्यार्थ्यांचे रक्तदान

बेळगाव (वार्ता) : रोटरी क्लब बेळगाव दक्षिण आणि रेडक्रॉस सोसायटी बेळगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात आज स्वयंप्रेरित रक्तदान शिबीर घेण्यात आले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या भाऊराव काकतकर महाविद्यालयात रोटरी क्लब बेळगाव दक्षिण आणि रेडक्रॉस सोसायटी बेळगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, …

Read More »

कन्नडीगांच्या संघटनांचा पुन्हा थयथयाट

बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात कन्नडीगांच्या संघटनांनी आपला थयथयाट सुरू ठेवला आहे. बुधवारी पुन्हा या संघटनांनी शहरात गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला. येथील कित्तूर चन्नम्मा चौकात गोंधळ माजवून संघटनेच्या सदस्यांनी निदर्शने केली. तसेच म. ए. समितीवर बंदी घालण्याची मागणी केली. येत्या दि. 31 डिसेंबर रोजी काही संघटनांनी कर्नाटक बंद …

Read More »

प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांना कबीर पुरस्कार जाहीर

बेळगाव (वार्ता) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारितेत अनेक वर्ष कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार आणि परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते संजय कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या शिरोडा येथील परिवारातर्फे देण्यात येणारा ‘कबीर साहित्य पुरस्कार’ बेळगाव येथील मराठी-कन्नड साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक तथा बेळगाव आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शोभा नाईक यांना जाहीर झाला आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी …

Read More »

बोरगावच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा

तिरंगी लढतीमुळे धाकधूक वाढली : 11 पर्यंत लागणार निकाल निपाणी (वार्ता) : सोमवारी (ता. 27) बोरगाव नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. 17 प्रभागांसाठी 50 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्र बंद झाले. गुरुवारी (ता.30) निकाल असून या निकालाकडे तालुक्याची नजर लागून राहिली आहे. युवानेते उत्तम पाटील, अण्णासाहेब हावले …

Read More »

उमेदवारांना पडतेय नगरसेवकपदाचे स्वप्न!

मतदानानंतर निकालाची प्रतीक्षा : झाल्या मतदानाचा हिशोब सुरू निपाणी (विनायक पाटील) : बेळगाव जिल्ह्यात चर्चेत असलेल्या बोरगाव नगरपंचायतीची 17 प्रभागातील निवडणूक अत्यंत चुरशी लढत झाली. नगरपंचायतीची ही निवडणूक असल्याने प्रत्येक उमेदवारांना आपणच नगरसेवक होणार असल्याचे निकालापूर्वी स्वप्न पडू लागली आहेत. झालेल्या मतदानाची आकडेवारीचा हिशोब उमेदवार करत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी(ता.30) …

Read More »

अ‍ॅल्युमिनियमसाठी टेट्रापॅकची होळी

बेळगाव : शीतपेयांच्या टेट्रापॅकमधील अ‍ॅल्युमिनियम मिळवण्यासाठी क्लब रोडवरील रस्त्याशेजारी असलेल्या झाडांखाली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांकडून कचरा पेटवून देण्याचा गैरप्रकार सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला. त्यामुळे रस्त्याकडेला कचरा टाकू, नका जाळू नका, परिसर स्वच्छ ठेवा हे सर्व नियम फक्त जनतेलाच लागू आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. …

Read More »

श्री जोतिबा मूर्ती घेऊन भाविकांचे डोंगराकडे प्रस्थान

बेळगाव (वार्ता) : गेल्या 55 वर्षांपासून प्रथा खंडित होऊ नये याकरिता येथील नार्वेकर गल्लीतील भक्त मंडळाच्या वतीने गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही जोतिबा मूर्तीची गाठ भेट करण्याकरिता वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर डोंगराकडे प्रस्थान करण्यात आले आहे. आज सकाळी मंदिरातील भाविकांच्या वतीने देवाची गाठभेट करण्याकरिता भाविकांनी प्रस्थान केले. चैत्र पौर्णिमेला दरवर्षी …

Read More »

नववर्ष स्वागताच्या नावाखाली होणारे गैरप्रकार थांबवा : हिंदू जनजागृती समिती

बेळगाव (वार्ता) : नववर्ष स्वागताच्या नावाखाली 31 डिसेंबरच्या रात्री होणारे गैरप्रकार थांबविण्याची मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. नववर्ष स्वागताच्या नावाखाली 31 डिसेंबरच्या रात्री युवावर्ग मद्यपान, धूम्रपान अशा अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रकार वाढत आहेत. पाश्चात्यांचे अंधानुकरण करत असे गैरप्रकार करण्यात येत आहेत. अनेक …

Read More »

कर्नाटक बंदला कन्नड संघटनांचा नकार!

बेळगाव (वार्ता) : राज्यभरात काही दिवसात झालेल्या अनुचित घटनांना महाराष्ट्र एकीकरण समितीला जबाबदार धरून काही कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला इतर काही कन्नड संघटनांनीच विरोध केला आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती सामाजिक शांतता बिघडविण्याचे कृत्य करत आहे, असा आरोप काही कन्नड संघटनांनी तसेच कन्नड आंदोलक वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली करत …

Read More »