Wednesday , December 17 2025
Breaking News

Classic Layout

गुजरातमध्ये नदीवरील पूल कोसळून ९ जणांचा मृत्यू

  वडोदरा : वडोदरा आणि आणंदाला जोडणारा महिसागर नदीवरून पूल कोसळला. पूल कोसळल्यामुळे अनेक वाहने नदीत पडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला तर ६ जणांपेक्षा अधिक जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती …

Read More »

शहापूर येथील जोशी मळ्यात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

  बेळगाव : बेळगाव शहरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. एकूण चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. तर त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी …

Read More »

केंद्रीय मंत्र्यांसोबत सिंचन प्रकल्पांवर शिवकुमारांची चर्चा

  वरिष्ठ अधिकारी, वकिलांसोबत दिल्लीत महत्त्वाची बैठक बंगळूर : केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राज्यातील सिंचन प्रकल्पांबाबत दिल्लीत वरिष्ठ अधिकारी आणि वकिलांसह एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला कृषी मंत्री चेलुवरयस्वामी, सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, वकील …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर राजकीय वर्तुळात औत्सुक्य

    बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठका आणि चर्चांना उधाण आले आहे. परदेश दौऱ्यावरून परतलेल्या राहुल गांधींसोबतच्या या दोन्ही नेत्यांच्या भेटींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर नाराज असलेल्या आमदारांना शांत करण्यासाठी प्रदेश काँग्रेस प्रभारी सुरजेवाला …

Read More »

आषाढी एकादशीनिमित्त सरस्वती विद्यामंदिर किणये शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली पायी दिंडी

  बेळगाव : किणये येथील सरस्वती विद्यामंदिर, किणये शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ श्री. ए. एन. गावडे आणि सर्व शिक्षकवर्ग …

Read More »

बडेकोळमठ मार्गाची पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पाहणी

  बेळगाव : बडेकोळमठ परिसरात वाढत्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, डीसीपी (गुन्हे) आणि संबंधित विभागाच्या प्रतिनिधींनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. गेल्या दहा वर्षांत या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये १९ जणांनी आपले प्राण …

Read More »

उद्यमबाग मुख्य रस्त्यावरील धोकादायक खड्डे यंग बेळगाव फाऊंडेशनने बुजवले!

  बेळगाव : बेळगावच्या उद्यमबाग भागातील पुरोहित स्वीट मार्टसमोरील मुख्य रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवून यंग बेळगाव फाऊंडेशनने सार्वजनिक सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल उचलत आपली सामाजिक बांधिलकी दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला होता, मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिक पडून जखमी झाले होते. अनेक तक्रारी करूनही कोणीही या …

Read More »

महामेळाव्याच्या “त्या” खटल्याच्या सुनावणीलाही सुरुवात

  बेळगाव : 9 डिसेंबर 2024 रोजी बेळगाव येथे कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन भरले होते, त्या अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र केस समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला होता, पण महामेळाव्याला परवानगी नाकारण्यात आल्याने समिती नेते व कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी महाराज चौकात महामेळावा सभा घेण्याचे घोषित केले. धर्मवीर संभाजी महाराज चौकात बेळगाव शहर, …

Read More »

खाजगी शाळांप्रमाणे सरकारी शाळेत दर्जेदार शिक्षण द्या : शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा

  शिक्षण विभागाची प्रगती आढावा बैठक बेळगाव : मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, सरकारी शाळांमध्ये मुलांचे प्रवेश वाढले पाहिजेत. संबंधित अधिकाऱ्यांनी खाजगी शाळांच्या धर्तीवर सरकारी शाळा चालवून मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दिशेने काम करावे, असे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण आणि साक्षरता विभागाचे मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले. मंगळवार दि. ०८ जुलै सुवर्ण विधान सौध सभागृहात …

Read More »

आषाढी एकादशीनिमित्त डी. वाय. सी. भरतेश शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली दिंडी

  बेळगाव : बेळगाव येथील डी. वाय. सी. भरतेश शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. शाळेच्या पटांगणातून या दिंडीचा शुभारंभ श्री. एम. बी. बखेडी आणि सर्व …

Read More »