Monday , September 21 2026
Breaking News

शहापूर येथील जोशी मळ्यात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. एकूण चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. तर त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जोशी मळा खासबाग येथील रहिवासी असलेल्या कुरडेकर कुटुंबातील संतोष कुरडेकर (४४), सुवर्णा कुरडेकर आणि मंगला कुरडेकर यांनी आत्महत्या केली. तर सुनंदा कुरडेकर यांची प्रकृती गंभीर आहे. यात आई, मुलगा आणि मुलीचा मृत्यू झाला आणि एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास केला. ही घटना शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *