Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

राज्यस्तरीय हॉकी शिबिरासाठी अभिनंदनीय निवड

बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेच्या श्रेया भातकांडे आणि प्राजक्ता निलजकर या हॉकीपटुंची वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेसाठी बेंगलोर येथे होणार्‍या राज्यस्तरीय शिबिराकरिता निवड झाली आहे. टिळकवाडी येथील गोगटे कॉलेजच्या विद्यार्थिनी असणार्‍या श्रेया भातकांडे आणि प्राजक्ता निलजकर या उत्तम हॉकीपटू आहेत. यापूर्वी अनेक हॉकी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी नोंदविणार्‍या या दोन्ही …

Read More »

येळ्ळूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम

येळ्ळूर : येळ्ळूर (ता. बेळगाव) गावामध्ये सध्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. नऊ जणांचा जावा घेणार्‍या या धोकादायक कुत्र्याला पकडण्यासाठी सध्या युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदर पिसाळलेल्या कुत्र्यामुळे येळ्ळूर गावात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. हे कुत्रे अचानक प्रकट होऊन अंगावर धावून जात असल्यामुळे नागरिकांना जीव …

Read More »

खानापूर-जांबोटी क्रॉसजवळचा धोकादायक खड्डा बुजवणार कधी?

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसजवळचा खड्डा गेल्या सहा महिन्यापासून तसाच आहे. याकडे संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. तर तालुक्याच्या आमदारांनी याची साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे या खड्ड्याचा दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाचे काम जत-जांबोटी महामार्गावरील परिश्वाड ते खानापूर …

Read More »

येळ्ळूर रस्त्यावर दोन बसची चढाओढ; कारवाईची मागणी

येळ्ळूर : येळ्ळूर रस्त्यावर एकमेकांना मागे टाकण्यासाठी दोन बसची चढाओढ होत असल्याचे आज निदर्शनास आले. बेभान बस चालवल्याबद्दल जाब विचारणार्‍या नागरिकांना परिवहन मंडळाच्या बस चालकांनी उद्दाम उत्तरे देत बससेवा बंद करण्याची धमकी दिल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित चालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे. आज येळ्ळूर रोडवर वायव्य कर्नाटक …

Read More »

येळ्ळूर येथे भग्न गणेश मूर्तींचे लोकसेवा फौंडेशनच्यावतीने विसर्जन

येळ्ळूर : येळ्ळूर येथे भग्न झालेल्या गणेश मूर्तींचे सर्व लोकसेवा फौंडेशनच्या वतीने विधिवत विसर्जन करण्यात आले. ज्या गणेश मूर्तींना तडा गेला असेल किंवा रेखीव नसतील अथवा भग्न झालेल्या मूर्ती भाविक खरेदी करत नाहीत, मूर्तिकार अथवा विक्रेते देखील त्या मूर्ती तशाच ठेवतात. अपवादात्मक परिस्थितीत काही विक्रेते अथवा मूर्तीकार अशा मूर्तींचे विसर्जन …

Read More »

हक्कासाठी शेतकर्‍यांची एकी महत्वाची

राजू पोवार : रयत संघटनेच्या हुन्नरगी शाखेचे उद्घाटन निपाणी : नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतकरी वर्षानुवर्षे अडचणीत सापडला आहे. महापूर व कोरोना काळात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. पण केवळ सर्वेच झाला असून आजतागायत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी रयत संघटना कार्यरत असून त्यासाठी शेतकर्‍यांची एकजूट …

Read More »

सबसिडी माफ करूनच वीजबिले द्या

माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर : वस्त्रोद्योग मंत्र्यांसमोर मांडल्या समस्या निपाणी : सबसिडी देऊनच वीज बिले माफ करावीत शिवाय टेक्स्टाईल व यंत्रमाग कारखानदारांच्या असणार्‍या समस्या व अडचणी राज्य सरकारने वेळीच सोडाव्यात अशी मागणी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री शंकराप्पा पाटील मुनीकोप यांच्याकडे माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी केली. बेळगाव …

Read More »

चन्नराज हट्टीहोळी यांची भाजपवर बोचरी टीका

बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात उपहासात्मक विधान करणार्‍या माजी आ. संजय पाटील यांच्या विरोधात हेब्बाळकर यांचे बंधू काँग्रेस नेते चन्नराज हट्टीहोळी यांनी बोचरी टीका केली आहे. ‘भाजप नेते हे अंधारात येऊन चोरी करणारे चोर आहेत‘ अशी टीका केली आहे. राजकीय वादातून बुधवारी रात्री माजी आ. संजय पाटील …

Read More »

नवज्योतसिंग सिद्धू-सीएम चन्नी यांच्यात दोन तास चालली बैठक

पंजाब सरकारने केलेल्या नियुक्त्यांवर दोघांमध्ये चर्चा चंदीगड : पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादात नवजोतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांची गुरुवारी भेट झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत पंजाब सरकारने केलेल्या नियुक्त्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमधील वैमनस्य काही प्रमाणात दूर झाले आहे, परंतु अजूनही अनेक …

Read More »

म. ए. समितीची 3 ऑक्टोबर रोजी बैठक

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांची बैठक रविवार दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी आणि माजी आमदार …

Read More »