राजू पोवार : रयत संघटनेच्या हुन्नरगी शाखेचे उद्घाटन
निपाणी : नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतकरी वर्षानुवर्षे अडचणीत सापडला आहे. महापूर व कोरोना काळात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. पण केवळ सर्वेच झाला असून आजतागायत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी रयत संघटना कार्यरत असून त्यासाठी शेतकर्यांची एकजूट महत्त्वाची आहे, असे मत चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. हुन्नरगी येथे आयोजित कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करून ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी दादासाहेब किल्लेदार होते.
प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे निपाणी तालुका अध्यक्ष आय. एन. बेग, निपाणी अध्यक्ष उमेश भारमल, सेक्रेटरी कालगौडा कोटगे, बेनाडीचे अध्यक्ष विवेक जनवडे, मलगौडा मिरजे उपस्थित होते.
प्रा. आय. एन. बेग यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायदा मारक ठरत आहे. त्याच्या विरोधासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी राजेंद्र सुतळे, रमेश माळी, सुधाकर कांबळे, शरण पाटील, रावसाहेब जाधव, राकेश कांबळे, रमेश सुतळे, दीपक कांबळे, प्रभाकर कांबळे, बाबासाहेब कांबळे, भारत शिंगे, प्रभाकर सुतळे, कुणाल सुतळे, अमोल कांबळे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. प्रशांत कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. आतिष सुतळे यांनी आभार मानले.
Check Also
श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …