Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

कसलेल्या जमिनीतून हुसकावल्याने शेतकऱ्यांचे बैलहोंगल तहसीलदारांविरोधात तीव्र आंदोलन

  बेळगाव : आपण कसलेल्या सुपीक कृषी जमिनीतून हुसकावून लावले जात असल्याचा आरोप करत बैलहोंगल तहसीलदारांविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विषारी औषधाची बाटली हातात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. हातात विषाची बाटली घेऊन धरणे धरलेल्या या शेतकरी कुटुंबांचे वास्तव्य बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील कडसगट्टी गावात आहे. ही शेतकरी कुटुंबे गेल्या …

Read More »

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट जाहीर

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणी डॉक्टर शिवाजी कागणीकर यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू सी एम त्यागराज यांनी ही माहिती आज सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. उद्या मंगळवारी सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या चौदाव्या पदवीदान …

Read More »

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड; सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन

  मुंबई : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ सुपरस्टार, हँडसम हंक धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते …

Read More »

बोरगाव मधील रोहिदास मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच लाखाचा निधी

  निपाणी (वार्ता) : आमदार शशिकला जोल्ले यांनी बोरगाव येथील चर्मकार समाजातील संत रोहिदास मंदिर बाबू जगजीवन राम भवन जिर्णोध्दरासाठी ५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा प्रारंभ हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. प्रारंभी समाजातील जेष्ठ नागरिक व महिलांच्या हस्ते भूमिपूजन …

Read More »

‘मावळा’ ग्रुपची यंदा अजिंक्यतारा, तोरणा किल्ल्यांची सफर

  अध्यक्ष आकाश माने यांची माहिती ; ग्रुपतर्फे पोशाख, मुक्कामाचा खर्च निपाणी (वार्ता) : प्रतिवर्षी तालुक्यातील शिवप्रेमींना गडकोट मोहीम घडवणाऱ्या ‘मावळा ग्रुप’ची यंदाची मोहीम ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधलेल्या तोरणा किल्यावर होणार आहे. शुक्रवारी (ता.२६) व शनिवारी (ता.२७ डिसेंबर) ही मोहिम होणार आहे. त्यासाठी नोंदणी सुरू असून शिवप्रेमी …

Read More »

राजहंसगडला रस्ते कामासाठी एक कोटी निधी मंजूर

  गावात बैठक घेऊन सर्वानुमते रस्ते करण्याचा निर्धार.. बेळगाव : राजहंसगड गावातील भंगी रस्त्यांची दुरवस्था झाली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यांची कामे रेंगाळली होती याची दखल बेळगांव ग्रामीण भागाच्या आमदार तसेच कर्नाटक राज्य महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर …

Read More »

सैन्यात भरती होण्यासाठी आलेल्या 800 उमेदवारांना दिला अल्पोपहार

  बेळगाव : बेळगावात सुरू असलेल्या टेरिटोरियल आर्मी (TA) बटालियन निवड प्रक्रियेसाठी देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या तरुणांच्या मदतीसाठी शहरातील युवक पुढे सरसावले आहेत. फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि यंग बेळगाव फाऊंडेशनच्या सदस्यांनी सीपीईडी ग्राउंड परिसरात सैन्य भरतीसाठी आलेल्या सुमारे 800 उमेदवारांना बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या वाटून सेवा दिली. या उपक्रमात संतोष …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत समाजाचे कन्नड वंशाचे; कन्नड साहित्यिकाचे वादग्रस्त वक्तव्य

  बेळगाव : बेळगाव मध्ये कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये बंधुत्वाचे नाते आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शुद्ध कन्नड वंशाचे होते. ते लिंगायत होते, असे वादग्रस्त वक्तव्य कन्नड साहित्यिक वाय.आर. पाटील यांनी केले आहे. कर्नाटक राज्य विकास संघटनेने आज बेळगावातील कन्नड भवन येथे विद्यार्थी प्रतिभा पुरस्कार आणि कन्नड राज्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

कर्नाटक सॉफ्ट बॉल प्रीमिअर लीग २०२५ : राजा शिवाजी बेळगाव संघाचा सुपर ८ (क्वार्टर फायनल) मध्ये प्रवेश

  बंगळुरू : कर्नाटक सॉफ्ट बॉल प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेतील सुपर १६ च्या रोमांचक सामन्यात राजा शिवाजी बेळगाव संघाने चिक्कमंगळुरू संघाचा ४० धावांनी पराभव करून सुपर ८ मध्ये प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात चिक्कमंगळूरूने संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चिक्कमंगळूरू संघावर उलटला. प्रथम फलंदाजी करताना राजा …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायस्कूलमध्ये येळ्ळूर क्लस्टर लेव्हल प्रतिभा कारंजी स्पर्धांचे उद्घाटन

  येळ्ळूर : प्रतिभा करंजी स्पर्धांचे आयोजन हा सरकारचा हेतू विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी खूप चांगला आहे शिक्षकांनी, पालकांनी विद्यार्थ्यांचे हे गुण हेरून त्यांच्या प्रदर्शनाला वाव द्यावा. यातूनच भावी उत्तम कलाकार निर्माण होतील असे उद्गार श्री. वाय. एन. मजुकर यांनी प्रतिभा कारंजी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष भाषणातून काढले. येळ्ळूर क्लस्टर …

Read More »