Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणीत ७ जानेवारीपासून ‘मालक चषक’ क्रिकेट स्पर्धा

Spread the love

 

अडीच लाखांची बक्षिसे : उद्योजक रोहन साळवे यांची माहिती

निपाणी (वार्ता) : स्थानिक क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. दिवस रात्र प्रकाश झोतातील क्रिकेटचा अनुभव मिळून तरुण खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘मालक चषक’ प्रभागनुसार डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ११ जानेवारीपर्यंत या स्पर्धा होणार असल्याची माहिती उद्योज रोहन साळवे यांनी दिली. येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
संयोजन समितीचे समन्वयक अंजुम उर्फ अनिल भोसले म्हणाले, येथील येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. त्यातील विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजार, रुपये व चषक, ३१ हजार व चषक, ११ हजार रुपये व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय मॅन ऑफ द सेरीजसाठी ५ हजार रुपये आणि चषक, मॅन ऑफ द मॅच साठी २५०० रुपये आणि चषक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजसाठी २५०० रुपये रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धा सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत चालणार आहेत.
स्पर्धेसाठी एकूण अडीच लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच रोहन साळवे फाउंडेशन तर्फे सर्व खेळाडूंना टी-शर्ट आणि सहभागी संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहेत. इच्छुक संघांनी २५ डिसेंबर अखेर अंजुम भोसले, अस्लम शिकलगार, बबलू मांगोरे, दादासाहेब हळवणकर, संतोष कांबळे (कार्लोस) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. यावेळी दिपक सावंत, रघुनाथ नाईकवाडे, बबलू मांगोरे, संतोष कांबळे, राजू नाईक, सुनील हिरुगडे, अरविंद पारळे, ओंकार बोंगार्डे, चेतन पांगिरे, बाळासाहेब कमते, संदीप पावले, यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कारगिल विजय दिनासह सुगते कुटुंबीयांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Spread the love  शहीदांना हरित अभिवादन; भूमी वात्सल्य फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम निपाणी (वार्ता) : कारगिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *